HW News Marathi
मुंबई

डी के रावच्या पोलिस कोटडीत वाढ

मुंबई खंडणी प्रकरणी पोलिसांनी डी के राव याला अटक केले होते याप्रकरणी आज न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने 23 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोटडीत वाढवीण्यात आले. गुन्ह्यातील महत्वपुर्ण धागेदोरे मिळवावयाचे असल्याचे तपास अधिका-याने सांगितल्याने त्यांची मुदतवाढीची विनंती मंजूर केली.

डी के रावला खंडणीप्रकऱणी 12 ऑक्टोंबरला अटक करण्यात आली होती आज पोलिस कोठडी संपल्याने पोलिसांनी न्यायालयात हजर केले न्यायालयाला पोलिस कोठ़डीत वाढ कऱण्याची विनंती तपास अधधिका-यांने केली असता विनंती मजूर करून 23 ऑक्टोंबर पर्यंत पोलिस कोटडीत वाढ कऱण्यात आली आहे.

मुंबई धारावी परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील (एसआरए) एका प्रकल्प सल्लागाराला त्याने ५० लाखांची खंडणी मागितली होती. व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. डी. के. राव यांच्यावर खून, खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षी एका खंडणीच्या गुन्ह्यातून मुक्तता झाल्यानंतर त्याने पुन्हा बिल्डर, उद्योजकांना धमकावून खंडणी गोळा करण्याचे सुरू केले होते

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात भाजप पराभूत- मुख्यमंत्र्यांना धक्का 

News Desk

आरपीआयचे उमेदवार निलंबित

News Desk

कॉग्रेसच्या आंदोलनामुळे मंत्रालयासमोर कडक पोलिस बंदोबस्त

News Desk