HW News Marathi
मुंबई

मुंबईतील ‘या’ धोकादायक पुलांची दुरुस्ती कधी होणार ?

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील पादचारी पूल आज (१४ मार्च) सायंकाळी कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला असून ३४ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी आणि अंधेरी पूल दुर्घटना या दोन्ही मोठ्या घटनेनंतर मुंबईतील पूलांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या दोन्ही घटनेनंतर मुंबई महापालिकाने शहरातील धोकादायक पुलांची दुरुस्ती करणार आहे. परंतु या धोकादायक पुलाच्या यादीत सीएसटीसी पुलाचा उल्लेख नव्हता. त्यामुले पालिकेच्या स्ट्रक्चरल ऑडिट प्रश्न चिन्ह उभे राहत आहे.

या ८ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले असून त्यानंतर या पुलंच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महापालिका सुमारे १६ कोटी ९१ लाख १४ हजार ९६२ रुपये खर्च करणार आहे.धोकादायक पुलांच्या दुरुस्तीचा निर्णय महापालिकेने घेतल्यानंतर मुंबई शहरातील महत्त्वाच्या आठ पुलांची मोठी दुरुस्ती यामध्ये करण्यात येणार आहे. यासाठी धोकादायक पुलांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव स्थायी समितीत गुरुवारी (२८ फेब्रुवारी) मंजूर झाला. त्यामुळे लवकरच महापालिका याचे काम हाती घेईल. यात रेल्वेचीही मदत घेतली जाणार आहे.

मुंबईतील ‘या’ आठ पुलांची होणार दुरुस्ती ?

  • महालक्ष्मी इथला रेल्वेवरील उड्डाणपूल
  • करी रोड स्टेशन उड्डाणपूल
  • शीव स्टेशन इथला रेल्वेवरील उड्डाणपूल
  • शीव (सायन) हॉस्पिटल धारावी इथला रेल्वेवरील उड्डाणपूल
  • दादर इथल्या रेल्वेवरील टिळक उड्डाणपूल
  • दादर फूल मार्केटजवळील पादचारी पूल
  • माहिम फाटक इथला पादचारी पूल
  • धारावी येथील दादर धारावी नाल्यावरील पादचारी पूल

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपची मुंबईमध्ये ममता बॅनर्जी यांच्याविरोधात निदर्शने

News Desk

राज्यातील हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

News Desk

चेंगराचेंरीत मृत झालेला तरूण जीवंत

News Desk