HW Marathi
मुंबई

संध्याकाळपर्यंत पूल दुर्घटनेचा जबाबदारी कोणाची हे निश्चित करा !

मुंबई | छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी (१५ मार्च) सायंकाळी साडे सातच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला, ३० हून अधिक लोक जखमी झाले आहे. त्यानंतर या दुर्घटनेनंतर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

“संध्याकाळपर्यंत या दुर्घटनेचा जबाबदारी कोणाची हे निश्चित करा,” असा आदेश मुख्यंत्र्यांनी पालिका आयुक्तांना दिला आहे. स्ट्रक्चरल ऑडिटनंतरही अशा घटना घडणे हे धक्कादायक आहे. ज्या पुलांचे ऑडिट झाले का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्यामुळे या घटनेत जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.

 

 

Related posts

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

पुढच्या १ महिन्यात मुंबईतील १५७ पुलांचे ऑडिट सादर करा, महापालिकेचा आदेश

News Desk

बारमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा धिंगाणा, कर्मचाऱ्यांना जबर मारहाण

News Desk