मुंबई | रमजानच्या निमित्ताने शासनाच्या अतिथीगृहावर इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली आहे. ही इफ्तार पार्टी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मुस्लीम शाखे तर्फे या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी या इफ्तार पार्टीवर आक्षेप घेतला असून ही पार्टी रद्द करण्याची मागणी या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
#Maharashtra: Two Mumbai-based activists have sought cancellation of an Iftar party organised by Muslim wing of Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) at the Sahyadri guest house, saying ‘no public or religious functions are allowed inside the venue. It is meant for official use only’
— ANI (@ANI) June 4, 2018
सह्याद्री अतिथीगृह हे शासकीय मालमत्ता असून या ठिकाणी कोणत्याही सार्वजनिक किंवा धार्मिक कार्यक्रमांस परवानगी नाही. या सह्याद्री अतिथीगृहाचा वापर केवळ शासकीय कार्यक्रमांसाठीच होणे अपेक्षित असल्याचे या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरएसएस यावर काय निर्णय घेणार हे पाहणे औसुक्याचे ठरेल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.