HW News Marathi
क्राइम मुंबई

अमृता फडणवीस फसवणूक प्रकरण; मुंबई पोलिसांनी डिझायनरला उल्हासनगरमधून घेतले ताब्यात

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांची फसवणूक करणारी डिझायनर अनिक्षाला पोलिसांनी उल्हासनगरमधून ताब्यात घेतले आहे.  बुकी अनिल जयसिंघानींच्या उल्हासनगरमधील घरावर मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने आज (16 मार्च) छापा टाकला. यावेळी त्यांची मुलगी डिझायनर अनिक्षाला पोलिसांनी ताब्यात घेतले. अमृता फडणवीस यांनी अनिक्षा विरोधात मलबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी उल्हासनगरमधील अनिक्षाच्या घरी छापा टाकला.

अमृता फडणवीस यांच्यावर दबाव आणून माझ्या मार्फत काही कामे करण्याचा प्रयत्न झाला आहे. सर्वप्रथम मला पैशाचे आमिष दाखविले. यानंतर मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता. यात अनिल जयसिंगानी नावाचा एक व्यक्ती आहे. आणि ही व्यक्ती 7-8 महिन्यापासून फरार आहे. अनिल जयसिंघानींवर 14-15 गुन्हे असून यांची मुलगी डिझायनर अनिक्षाने 2016-16 दरम्यान अमृता फडणवीसला भेटली होती. यानंतर तिने अमृता फडणवीसला भेटणे बंद झाले. परंतु, अचानक 2021 नंतर अनिक्षाने पुन्हा अमृता फडणवीस यांना भेटाला सुरुवात केली. यावेळी अनिक्षाने अमृता फडणवीसचा विश्वास संपादन केले. यानंतर तिने येणे जाणे सुरू केले.”

नेमके काय आहे प्रकरण

अमृता फडणवीस यांनी एका डिझायनर विरोधात मुंबईतील मलबार हिल पोलीस स्थानकात 20 फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती. या तक्रारीनतंर पोलिसांनी अनिक्षा असे या डिझायनरचे नाव असून तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. अनिक्षा दीड वर्षापासून अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती. तिने अमृता फडणवीस यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत बुकींची माहिती देऊन 1 कोटी रुपयांच्या आमिषाची ऑफर दिली. अमृता फडणवीस यांना आरोपी महिलेने आणि तिच्या वडिलांनी केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dahi Handi |उच्च न्यायालयाने दहीहंडी पथकांवर घातले निर्बंध,बाल गोविंदांचा समावेश असल्यास होणार कारवाई

News Desk

“कांग्रेस मुक्त भारत ते मोदी मुक्त भारत”- राज ठाकरे

swarit

मोटरमनच्या प्रसंगावधानानं वाचला जीव

News Desk