HW News Marathi
मुंबई

ऑफिस मध्ये डेस्क योगा

मुंबई | मुंबईकरांची सुरुवात सकाळी लोकलमध्ये जागा पकडण्यापासून ते ऑफिसमध्ये पोहचण्यापर्यंत धावपळीत होते. यात मानसिक तसेच शारीरिक त्रास हा रोज होतच असतो. यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे. संयुक्त राष्ट्राने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. भारताच्या नेतृत्वाखालील १७५ देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव करण्यात आला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबरमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतही हा प्रस्ताव मांडला होता. त्याला तीन महिन्यांनंतर मान्यता देण्यात आली आहे.

संघवी पार्श्व ग्रुप ऑफ कंपनीत’ आंतरराष्ट्रीय योग दिन’ बुधवारी साजरा करण्यात आला. संघवी पार्श्व ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रमेश संघवी यांच्या प्रयत्नाने कार्यालयात योग दिन साजरा करण्यात आला. यात कार्यालयातील सर्व कर्मचारी अधिकारी वर्ग उपस्थित होता. यावेळी कर्मचारी बोलतांना म्हणाले, रोज आम्ही योगा करत नाही पण आज योगा-योगाने आम्ही योगा केला. प्रचंड समाधान मिळाले. आता पुढे नक्की योगा करत राहू. असे कर्मचारी HW मराठीशी बोलतांना बोलत होते.

२१ जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. भारतातील ५००० वर्षे जुनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान करणाऱ्या मेट्रो मार्गिकेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण

Aprna

आज पश्चिम-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

News Desk

भेंडीबाजार इमारत कोसळून आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू, 15 जण जखमी

News Desk