HW News Marathi
मुंबई

ठाण्यात ट्रॅक ओलांडताना एकाचा मृत्यू

मुंबई | ठाण्यात ट्रॅक ओलांडताना लोकलखाली येऊन एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. ही घटना ठाणे प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर घडली आहे. लोकलखाली आलेल्या त्या अनोळखी इसमाची अद्याप ओळख पटली नाही.

या घटनेनंतर ठाण्याहून सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. जलद मार्गावरील वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेलना नाही. ऐन गर्दीच्या वेळी हा बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आठवड्याच्या सुरुवातीलाच त्रासाला सामोरे जावे लागते.

जुलै महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी उपनगरीय प्रवाशांसाठी घातक ठरला आहे. शुक्रवारी विविध कारणांमुळे मुंबई उपनगरीय लोकल मार्गावर १४ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर नऊ प्रवासी जखमी झाले. या दिवशी ठाणे स्थानकात सर्वाधिक प्रवाशांच्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली तर, यात तीन प्रवाशांचे निधन आणि एक प्रवासी जखमी झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी गेलेल्या स्पीड बोटच्या अपघात १ जण बुडाल्याची भीती

News Desk

डॉ. तडवी आत्महत्या प्रकरण | तिन्ही आरोपींच्या जामीनाची सुनावणी १० जूनपर्यंत तहकूब

News Desk

केडीएमसीचे नगरसेवक करणार केरळसाठी एक महिन्याचे वेतन दान

News Desk