HW News Marathi
मुंबई

बीड जिल्ह्यासह राज्यातील रूग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा | धनंजय मुंडे

मुंबई | बीड जिल्ह्यासह संपुर्ण राज्यातील शासकीय रूग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला असल्याच्या मुद्दाकडे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत सभागृहाचे लक्ष वेधले.

नियम 93 अन्वये हा मुद्दा उपस्थित करताना मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील जिल्हा रूग्ग्णालय, तालुका राज्यातील सर्व रूग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा जाणवत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. प्रथमोपचार औषधापासुन ते अपघाती व विषबाधा झालेले रूग्ण, बालके यांच्यासाठीही औषधे मिळत नसल्याचे ते म्हणाले.

औरंगाबादच्या घाटी रूग्णालयातील औषधांची टंचाई, राज्यातील सर्वच रूग्णालयातील परिस्थितीही त्यांनी यावेळी बोलताना विषद केली. श्वानदंश, सर्पदंश औषधांच्या टंचाईकडेही त्यांनी लक्ष वेधले. या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्य मंत्री दिपक सावंत यांनी राज्यात सर्वत्र औषधांचा पुरेसा साठा असुन

मुंडे यांनी सांगितलेल्या सर्व तक्रारींची पुन्हा एकदा खात्री करून घेतली जाईल, घाटी रूग्णालयातील औषध पुरवठा व्यवस्थित राहील याकडे स्वत: लक्ष देऊ, असे आश्वासन दिले. श्वानदंश, सर्पदंश झाल्यानंतर लागणारी औषधे उपलब्ध असुन त्याचा कोणी कृत्रिम तुटवडा करीत असले, तर त्या अधिकाऱ्याला त्या क्षणी निलंबित करण्यात येईल, असा इशारा दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आरे मेट्रो कारशेड वाद : पर्यावरणप्रेमींचं मध्यरात्री आंदोलन

News Desk

लेट लथिफ मुंबई विद्यापीठ -210 परिक्षांच्या निकालासाठी 45 दिवस

News Desk

चोरीचा मोबाइल ठरणार निकामी

News Desk
महाराष्ट्र

राज्यात प्लास्टिक बंदी, नियम मोडल्यास तीन महिन्याचा कारावास

News Desk

मुंबई | पर्यावरण मंत्री रामदास कदम गुढीपाडव्याच्या शूभ मुहूर्तावर राज्यात प्लास्टिक बंदीची घोषणा केली आहे. सार्वजनिक कार्यक्रमात वापरण्यात येणाऱ्या थर्माकॉलच्या ताट-वाटे पेले यांच्यावरही बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे रामदास कदम यांनी आज विधानसभेत सांगितले. दरम्यान, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २५ हजार रुपये दंड तसेच तीन महिन्याचा कारवासाची शिक्षा होणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला असून याबाबत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी विधानसभेत केले. प्लास्टिकपासून बनविल्या जाणाऱ्या पिशव्या, थर्माकॉलच्या वस्तू, प्लास्टिक पाऊस, वेष्ठन असेलेली उत्पादने, त्याची साठवणूक, विक्री करण्यावरही पूर्णतः बंदी घालण्यात आलेली आहे.

तसेच या निर्णयातून काही उत्पादने वगळण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये औषधांच्या वेष्ठनांसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक, वन व फलोदोत्पनासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक वगळण्यात आले आहे. मात्र, याबाबत नवीन नियमावली करण्यात आली असून ठळकपणे या उत्पादनाचा वापर कशासाठी केला जाणार आहे, हे ठळकपणे नमूद करणे सक्तिचे करण्यात आले आहे. तसेच आयात-निर्यात करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकवर औद्योगिक वापर असल्याचे नमूद करावे लागणार आहे.

दुधाच्या पॅकेजिंगसाठी पन्नास मायक्रॉनपेक्षा जाड पिशव्या वापरण्यास परवानगी असून मात्र, या पिशव्यांचा पुनर्रवापरासाठी असलेली नोंद पिशव्यावर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच या पिशव्यांचा पुनर्वापराचा खर्च प्रत्येकी पन्नास पैशांपेक्षा कमी खर्च असावा, असे दूध डेअरींना उत्पादकांना सूचित करण्यात आले आहे. तसेच पुनर्रखरेदीही बंधनकारक करण्यात आले आहे.

प्लास्टिकच्या पाण्याचा बाटल्याच्या पुनर्रवापरही बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच या वस्तुंना प्रतिबंधित करण्याऐवजी वस्तू व सेवा कर संचालनलयाकडून उत्पादन स्तरावर प्रत्येक आकारमानानुसार पुनर्रवापर आणि पुनर्रचरक्रन शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच किरकोळ विक्री स्तरावर मनपा, नगरपंचायतीकडून कर वसूली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुनर्रवापराद्वारे मिळणारा जीएसटीचा परतावा पुनर्रवापर करणाऱ्या उत्पादन कंपन्यांना परत देण्याचे तरतूद करण्यात आली आहे.

Related posts

पोहरादेवी जगदंबा देवीचे महंत कबिरदास महाराज यांच्यासह १९ जणांना कोरोनाची लागण  

News Desk

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतकऱ्यांना पत्राद्वारे भावनिक साद

Aprna

‘तो शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार’, छगन भुजबळांचं किरीट सोमय्यांना प्रत्युत्तर

News Desk