HW News Marathi
मुंबई

दिवाळीच्या तोंडावर  मध्य रेल्वेचा होणार खेळखंडोबा  

मुंबई एेन दिवाळीच्या तोंडावर मध्य रेल्वेचा खेळखंडोबा होण्याची दाट शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या मोटरमन संघटनेने येत्या १५ ऑक्टोबर पासून अतिरिक्त काम न करण्याचा निर्णय घेतलाआहे. रेल्वे प्रशासनाने मोटरमन बाबत अतिशय कडक धोरण स्वीकारल्याने हा निर्णय घेतला असल्याचे मोटरमेन्स संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र तळेकर यांनी महाबातमी बरोबर बोलताना सांगितले.

 

मोटरमेनच्या या आंदोलनामुळे मध्य रेल्वेच्या पाचशे ते सहाशे फेऱ्या त्या दिवशी रद्द कराव्या लागणार आहेत. त्यामुळे एेन सणासुदीत प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. रेल्वे प्रशासनाने आमची बाजू ऐकून न घेतल्यास हे आंदोलन अधिकच तीव्र करण्याचा इशारा मोटरमेन्स संघटनेने दिला आहे.
मध्य रेल्वे मध्ये सध्या २३१ मोटरमेनच्या जागा भरल्या गेल्या नाहीत. त्यामुळे मोटरमनला दहा ते बारा तास काम करावे लागते. ओव्हरटाईम हा नित्याचाच झाला आहे. त्यामुळे अनेक जण तणावात काम करत आहेत. अश्या स्तिथीत ही रेल्वे प्रशासन मोटरमेनच्या अडचणी समजूत घेत नसल्याने येत्या १५ ऑक्टोबर पासून मोटरमन संघटनेने असहकार आंदोल करण्याचा निर्णय घेतला आहे असे तळेकर यांनी स्पष्ट केले. मोटरमेनच्या छोट्या छोट्या चूकांवर नोकरी वरून काढण्याची कारवाई केली जाते. आतापर्यंत १३ जणांवर ही कारवाई सुरु असून वि .जी. नायर या मोटरमनला प्रशासनाने काढून टाकले आहे अशी माहिती तळेकर यांनी दिली. आंदोलनामुळे रेल्वे प्रशासन आणि मोटरमेन संघटनेत संघर्ष अटळ आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पनवेलमध्ये वैदू नगर झोपडपट्टीला आग

News Desk

उपनगरीय रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक

swarit

लोअर परळ येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी तब्बल ११ तासांचा मेगाब्लॉक

News Desk