मुंबई | डोंबिवलीतील एमआयडीसीमधील मेट्रोपॉलिटन एक्सिकेम कंपनीला मंगळवारी (१८ जानेवारी) दुपारी १२च्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीची भीषणता इतकी मोठी आहे कि आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात सध्या धुराचे साम्राज्य झाले आहे. अग्निशमन दलाच्या तब्बल १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अद्याप ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून मोठे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, डोंबिवली एमआयडीसीत वारंवार घडणाऱ्या या आगीच्या घटनांमुळे आता येथील कर्मचाऱ्यांसह डोंबिवलीकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Thane: Fire breaks out in a chemical factory in Dombivali. Four fire tenders rushed to the spot. More details awaited #Maharashtra pic.twitter.com/IkJsYQH0Mk
— ANI (@ANI) February 18, 2020
अवघ्या काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या भागाची पाहणी केली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी येथील कंपन्यांना सुरक्षेसंदर्भात काही कठोर सूचना केल्या होत्या. डोंबिवली एमआयडिसीतील निष्काळजीपणे काम करणाऱ्या कंपन्यांना “सुरक्षा यंत्रणा राबवा नाहीतर कंपन्यांना टाळे ठोका”, असे कठोर आदेश दिले होते. या संबंधित कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा आहे. या आगीमुळे केमिकलच्या ड्रममध्येही सतत स्फोट सुरु असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर, सध्या येथील रहिवाशांमध्ये प्रचंड असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. इतकेच नव्हे तर शाळा आणि कंपन्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.