HW News Marathi
मुंबई

देवदत्त धनोकर यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

मुंबई | पैसे कसे कमवायचे आणि त्याची गुंतावूक कशी करायची या विवंचनेत आपण नेहमीच असतो. पैसा झाडाला लागत नाही पण पैशाची गुंतवणूक योग्य ठिकाणी केल्यावर त्यापासून नक्कीच फळ मिळते. देवदत्त धनोकर यांच्या “म्युच्युअल फंड गुंतवणूकीचा गुरुमंत्र” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न’ झाला. पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच प्रबोधनकार ठाकरे सभागृह(मिनी), बोरीवली (पश्चिम) मुंबई येथे पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून गुंतवणूक विश्लेषक चंद्रशेखर ठाकूर, गुंतवणूक विशेषज्ञ गुरुदत्त धनोकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुस्तक प्रकाशन सोहळ्याबरोबरच “शेअर आणि म्युच्युअल फंड गुंतवणूकीसह आर्थिक उद्दिष्ट कसे साध्य करायचे ” या विषयावर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. लेखक देवदत्त धनोकर शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आर्थिक विषयावर मागील १५ वर्षापासून मार्गदर्शन करत आहेत. गुरुदत्त धनॊकर यांनी आपल्या या ज्ञानाचा १५ हजारहून अधिक गुंतवणूकदारांना फायदा करून दिलेला आहे.

प्रकाशन सोहळ्यामध्ये परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेअर बाजार तज्ज्ञ म्हणून ५० वर्षे कार्यरत असलेले चंद्रशेखर ठाकूर यांनी गुंतवणूक कशी करावी, शेअरबाजारामध्ये गुतंवणूक करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी. बदललेली सरकारी धोरण या बद्दल उपस्थितांना उत्तम मार्गदर्शन केले. तर मराठी माणूस शेअर बाजारामध्ये किंवा म्युच्युअल फंड कुठे मागे पडता कामा नये यासाठीच या पुस्तकाची निर्मिती केली आहे असे मत गुरुदत्त धनोकर यांनी व्यक्त केले. त्याच प्रमाणे वाचकांनी पुस्तकाला भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील जेल भरो आंदोलनाला अल्प प्रतिसाद

swarit

मुंबईकरांसाठी नवीन वर्सोवा-बांद्रे सी-लिंक

News Desk

प्रिन्स हॅरीच्या लग्नानिमित्त डबेवाले वाटणार मिठाई

News Desk