HW News Marathi
मुंबई

Dongri Building Collapsed : ‘बी’ वॉर्डचे सहाय्यक आयुक्त निलंबित

मुंबई | डोंगरी इमारत दुर्घटनेत १३ जणांना जीव गमवावा लागल्यामुळे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात ‘बी’ वॉर्डचे प्रभारी सहाय्यक आयुक्त विवेक राही यांना निलंबित केले असल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी (१८ जुलै) स्थायी समितीत डोंगरी दुर्घटनेवरून शिवसेनेसह सर्व पक्षीयांनी प्रशासनाला धारेवर धरल्याच्या पार्श्वभूमीवर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सहायक आयुक्तांचे निलंबन करा असे निर्देश आयुक्तांना दिले होते.

डोंगरी येथे केसरबाई इमारत मंगळवारी (१६ जुलै) कोसळून मोठी दुर्घटनेत घडली होती. या पार्श्वभूमीवर बी वॉर्डचे सहायक आयुक्त यांच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थायी समितीकडून करण्यात आला होता. ‘बी’ वॉर्डमध्ये पालिका अधिकारी आणि बेकायदा बांधकाम करणाऱ्याचे रॅकेट सुरू असल्याचे सांगत पालिका आयुक्तांनी कठोर कारवाई करावी असे निर्देश यशवंत जाधव यांनी दिले होते.

यावेळी शिवसेनेसह सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी बी, सी आणि डी वॉर्डमध्ये बेकायदा बांधकामे राजरोसपणे सुरू असून या विभागात डिझास्टर ऑडिट करण्याची मागणीही केली होती. या दुर्घटनेची सखोल चौकशीही सुरू करण्यात आली असून राही यांच्या जागी वीसपुते यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आल्याचे समजते. दुर्घटनेनंतर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीदेखील दुर्घटनेची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा असे आदेशही पालिका प्रशासनाला दिले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेल्वे तिकीट काढताना महिलेच्या डोक्यावर कोसळला स्लॅब

News Desk

दोन लोकल ट्रेनसमोरा समोर

swarit

शिवसेनेच्या विरोधामुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले

News Desk