HW News Marathi
मुंबई

रेल्वे तिकीट काढताना महिलेच्या डोक्यावर कोसळला स्लॅब

मुंबईतील रेल्वे पुलांचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच आता रेल्वेस्थानकेही जर्जर झाल्याचं आढळून आलं आहे. अंधेरी स्टेशन परिसरात तिकीट काढण्यासाठी उभ्या असलेल्या एका महिलेच्या डोक्यावर रविवारी रात्री अचानक स्लॅब कोसळला. त्यामुळे महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. महिलेला तत्काळ कुपर रूगणालयात उपचाराठी दाखल करून उपचार करण्यात आले. आशा मोरे असं या ५६ वर्षीय महिलेचं नाव आहे. स्लॅब कोसळल्यानं या महिलेच्या डोक्याला २० टाके पडले आहेत.

उपचार केल्यानंतर महिलेला घरी पाठवताना रेल्वेने अवघ्या ५०० रूपयांची नुकसान भरपाई दिली आहे. रेल्वेच्या या मदतीवर मोरे कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. अवघ्या ५०० रूपयांत डोक्यावरील उपचार कसे होणार? असा सवाल त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संध्याकाळपर्यंत पूल दुर्घटनेचा जबाबदारी कोणाची हे निश्चित करा !

News Desk

मुंबईत जमावाकडून पोलिसांना मारहाण

News Desk

गोखले पूल दुर्घटनेला रेल्वे-पालिका नक्की जबाबदार कोण ?

News Desk