HW News Marathi
मुंबई

डॉ. आंबेडकर स्मारकाचा खर्च १६६ कोटींनी वाढला

मुंबई: मुंबईतील इंदू मिल येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबडेकर स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले,परंतु अद्याप त्याचे काम सुरू झाले नाही. २३ महिन्याच्या विलंबामुळे स्मारकाच्या खर्च १६६ कोटींनी वाढला आहे. सध्या सुमारे ५९१ कोटी रुपये इतका अंदाजित खर्च येणार असल्याची माहिती एमएमआरडीएने दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाने कडे इंदू मिल येथील डॉ. आंबेडकर स्मारकाची माहिती मागितली होती. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.य् त्यावेळी राज्य शासनाने ४२६ कोटी खर्च येणार असल्याची माहिती दिली होती. स्मारकाच्या बांधकामासाठी १४ एप्रिल २०१७ रोजी रचना व बांधणे या तत्वावर निविदा मागविण्यात आल्या आहेत. निविदेसंबंधी कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्मारकाचे काम सुरू होईल. यासाठी सुमारे ५९१ कोटी रुपये इतका अंदाजित खर्च येईल. या कामासाठी शासनाने आर्किटेक्ट मेसर्स शशी प्रभू अँड असोसिएटस् यांची नियुक्ती केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत हॉप ऑन– हॉप ऑफ बस सेवेचा शुभारंभ

Aprna

धारावीतील कोळीवाड्यांचे सीमांकन करून डी आर पी योजनेत समाविष्ट करा | चंद्रकांत पाटील

News Desk

रिलायन्स कंपनीची निवड कुणी केली, हे ड सॉल्ट एव्हीएशनलाच माहिती !

Gauri Tilekar