HW News Marathi
मुंबई

डॉ.अमरापूरकर मृत्यूप्रकरणी चौघांना अटक

मुंबई- 29 ऑगस्ट रोजी मुंबईत आलेल्या प्रलंयकारी पावसात बॉम्बे हॉस्पिटलचे पोटविकारतज्ज्ञ डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मेनहोलमध्ये बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. या चारही जणांना 22 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सिद्धेश भेलसेकर (वय 25 वर्ष), राकेश कदम (वय 38 वर्ष) त्याचा भाऊ निलेश आणि दिनार पवार (वय36 वर्ष) अशी अटक केलेल्या चार जणांची नावे आहेत. डॉक्टर अमरापूरकर यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने त्यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. अटक केलेल्या चार जणांनी मॅनहोलचे झाकण उघडले होते. पावसाचे पाणी त्यांच्या घरात शिरत होते, या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी त्यांनी मॅनहोलचे झाकण उघडल्याचे माहिती समोर आली आहे. या चौघांना झाकण उघडण्याचा कोणताही अधिकार नव्हता. शिवाय त्यांनी कोणताही सूचना फलक लावला नव्हता. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकुब मेननप्रमाणे भिडे, एकबोटेवर कारवाई कराः प्रकाश आंबेडकर

News Desk

LIVE UPDATES | अंधेरी गोखले ब्रीज

News Desk

लोकसभेत आठवलेंना विजयी करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा निर्धार

swarit
मुंबई

फेरीवाल्यांना हटवा, राज यांचे आयुक्तांना निवेदन

News Desk

मुंबई: राज ठाकरे यांनी बुधवारी महापालिका आयुकत्त अजय मेहता यांची भेट घेऊन रस्त्यांवरून फेरीवाल्यांना त्वरीत हटवण्यासंदर्भात निवेदन सादर केले. यावेळी राज यांनी रेल्वे पूल आणि फुटपाथवरून चालणा-या लोकांच्या समस्याही त्यांच्यापुढे मांडल्या. या निवेदनात राज यांनी फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंदभार्तील अनेक मुद्देही उपस्थित केले आहेत.

या समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी आयुक्तांनी पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांशी चर्चा करावी. जेणेकरून तिन्ही यंत्रणांच्या समन्वयातून ठोस पावले उचलली जातील. मनसेच्या संताप मोचार्नंतर बहुतांश रेल्वे स्थानकांच्या परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्यात आले आहे. मात्र, हे सगळे किती दिवस टिकेल, असा प्रश्नही लोकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे लोकांना यासंदर्भात तक्रारी करण्यासाठी पालिकेने व्हॉटसअ‍ॅप क्रमांक उपलब्ध करून द्यावेत. फेरीवाले बसतात त्या परिसरात हे व्हॉटसअ‍ॅप क्रमांक असलेले फलक पालिकेने लावावेत. जेणेकरून प्रवाशांना त्यांच्या परिसरात फेरीवाल्यांकडून होणाºया अतिक्रमणाचे फोटो पाठवता येतील.

Related posts

बेस्ट कर्मचाऱ्यांना पालिकेची दिवाळी भेट

News Desk

तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

News Desk

ओएनजीसीचे हेलिकॉप्टर कोसळले

News Desk