HW News Marathi
मुंबई

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण | आरोपींची पोलीस कोठडी देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

मुंबई | डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही महिला आरोपींना पोलीस कोठडी देण्याची क्राईम ब्रँचची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (६ मे) फेटाळली आहे. या प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी मिळावी यासाठी क्राईम ब्रँचने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाने क्राईम ब्रँचची ही मागणी फेटाळली आहे. दरम्यान, आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना तुरुंगात आरोपींची चौकशी करण्याची मुभा उच्च न्यायालयाने क्राईम ब्रँचला दिली आहे.

गुरुवारी (६ मे) दुपारी २ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत त्याचप्रमाणे पुढचे तीन दिवस सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आरोपींचा ताबा क्राईम ब्रँचला मिळणार आहे. दरम्यान, बुधवारी (५ मे) मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील तिन्ही महिला आरोपी डॉक्टरांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर क्राईम ब्रँचला आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश देऊन या प्रकरणाची सुनावणी १० जूनपर्यंत तहकूब केली होती.

मुंबई सत्र न्यायालयाकडून ३१ मे रोजी या तिन्ही आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. क्राईम ब्रँचकडे या प्रकरणाची चौकशी जरी सोपविण्यात आली असली तरीही या तिन्ही आरोपींची पोलीस कोठडी न मिळाल्याने क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांना आरोपींची चौकशी करता आली नव्हती. म्हणूनच, क्राईम ब्रँचने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, क्राईम ब्रँचची ही मागणी फेटाळून लावत उच्च न्यायालयाने न्यायालयीन कोठडीतच आरोपींची चौकशी करण्याची मुभा क्राईम ब्रँचला दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील धर्म व्हीला इमारतीमध्ये भीषण आग

News Desk

टिकटॉक फेम फैझल शेखसह ४ जणांवर गुन्हा दाखल

News Desk

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल ?

News Desk