HW News Marathi
मुंबई

महापालिकेच्या दुर्लक्षामुळे कोळीवाड्यात कच-याचे साम्राज्य

मुंबई | मुंबई शहरात रहाणा-या प्रत्येकाला वरळी सारख्या ठिकाणीराहण्याची उत्सुकता असते. त्याचे मुख्य कारण म्हणजे वरळीलालाभलेला विस्तीर्ण समुद्र किणारा पर्यटकांचे आकर्षण असेलेले वरळीसीफेस समुद्राची थंड हवा ऐतिहासिक वारसा असलेला वरळीचाकिल्ला भव्य असा कोळीवाडा टोलेजंग इमारती यांसारख्या अनेककारणांमुळे मुंबईकरांसह अनेकांना वरळीमध्ये रहाण्याची वरळीपहाण्याची इच्छा असते. परंतु महापालिकेच्या हलगर्जीपणामुळेलोकांच्या या अपेक्षा येत्या काळात पुर्णपणे भंग होणार असल्याचे चित्रसध्या वरळी कोळीवाड्यात समुद्र किनारी पहायला मिळत आहे.

गेल्या अनेक दिवसात महापालिकेने लक्ष न दिल्यामुळे या ठिकाणीकच-याचे ढिग जमलेले दिसून येत आहेत. अनेकांनी आपल्या घराचीडागडुजी केल्या नंतर निघालेले डेब्रीज देखील समुद्र किनारी फेकलेलेआहे. कोळीवाड्यातली सध्याची सर्वात मोठी समस्या म्हणजेशौचालयांची कमतरता. शौचालयांची संख्या कमी असल्यामुळे अनेकरहिवासी उघड्यावर शौचाला जातात. उघड्यावर शौचाला जाणे आणिसमुद्र किनारी पडलेल्या कच-यामुळे या ठिकाणी लोकांच्याआरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. दरवर्षी पावसाळ्यातस्थानिकांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

समुद्र किनाराच नव्हे तर वरळी किल्ल्याच्या परिसरातही कचरा सर्वत्र विखूरलेला दिसून येतो. या ठिकाणच्या स्थानिक नगरसेविका सध्या मुंबईच्या उपमहापौर आहेत. तसेच या आधीही उपमहापौर असलेल्या हेमांगी वरळीकर या विभागात नगरसेविका होत्या. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता, विभागात शिवसेनेचे नगरसेवक असूनही कोळीवाड्यातल्या स्थानिकांना मात्र विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्यामुळे स्थांनिकांमधून नाराजीचा सुर निघताना पहायला मिळत आहे.

रोज कचरा उचलण्यासाठी येणारी महापालिकेची घंटा गाडी देखील एका मर्यादित लोकांपर्यंतच पोहचते त्यामुळे अनेक लोक कचरा उघडावर फेकत असल्याचा आरोपही स्थानिक करत आहेत. महापालिकेने बांधलेल्या शौचालयांमध्ये 3 रुपये घेतले जातात त्यातच शौचालयांची संख्या कमी आहे यासह अनेक समस्या वरळी कोळीवाड्यात आवासून उभ्या असलेल्या दिसून येत आहेत. महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे तसेच स्थानिक नगरसेवकांच्या दुरलक्षामुळे वरळी कोळीवाड्याचे सौंदर्य सध्या लोप पावत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

  • स्वच्छ समुद्र किना-यासाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार

आभा सामाजिक संस्थेकडून अनेकदा पथनाट्यांद्वारे या ठिकाणी विविध जनजागृती संदेश देऊन लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामध्ये कचरा समुद्रात टाकू नका, उघड्यावर शौच करु नका, दारु पिऊ नका, झाडे तोडू नका यांसह अनेक विषयांना पथनाट्याव्दारे वाचा फोडण्यात आली आहे. आभा सामाजिक संस्थेद्वारे फक्त पथनाट्य नाही तर स्वच्छता अभियान देखील राबविण्यात आले आहे. हा परिसर स्वच्छ व्हावा यासाठी मिसाल मुंबई या संस्थेव्दारे देखील स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. परंतु लोकांच्या सवयीला पर्याय नाही त्यातच पालिकेचा कामचुकारपणा आणि नगरसेविकेचे दुर्लक्ष त्यामुळे या ठिकाणी परिस्थिती जैसे थे असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.

  1. चेतन पाटील, स्थानिक रहिवासी

आमच्या लहानपणी कोळीवाड्याचे चित्र वेगळे होते. तेव्हा प्लास्टिक पिशव्यांचा वापर देखील कमी प्रमाणात होत असल्यामुळे कच-याचा इतका खच समुद्र किनारी पडत नव्हता. कोळीवाड्यात असलेले रस्ते रुंद होते. दिवसेंदिवस लोकांनी बांधकामे करुन रस्ते अरुंद झाले आहेत. त्यातच रीनोवेशन नंतर जमलेले डेब्रीज समुद्र किनारी फेकलेले आहे. कोळीवाड्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत शौचालयाची कमतरता आहे. शौचलय उपलब्ध आहेत त्या ठिकाणी चार्ज आकारल्यामुळे लोक उघड्यावर जाणे पसंद करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्लीच हागणदारी मुक्त महाराष्ट्राची घोषणा केली परंतु सध्या महाराष्ट्र नव्हे पण वरळी, माहिमचे कोळीवाडे अजून हागणदारी मुक्त झालेले नाहीत हि सध्याची सत्य परिस्थिती आहे. भाजप सरकारच्या हागणदारी मुक्त महाराष्ट्राचा असाही एक चेहरा आहे. अनेकदा सोशल मिडीयाच्या माध्यमातून स्थानिक नगरसेविकेच्या लक्षात आणून देण्यासाठी मी प्रयत्न केला आहे. कचऱ्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे परिसरात मच्छर चे प्रमाण वाढले आहे. सरकार महापालिका प्रशासन यांनी लक्ष घालून स्थानिकांची समस्या दुर करणे गरजेचे आहे.

  1. अनिष खर्डे, स्थानिक रहिवासी,

अनेक वर्षात वरळी कोळीवाड्यात मी रहातो. उपनगरात रहाणा-या लोकांना वरळीचे आकर्षण असल्याचे त्यांच्या बोलण्यात मला अनेकदा जाणवले परंतु वरळी कोळीवाडा आणि समुद्र किनारी असलेले कच-याचे खच पाहीले तर अशा लोकांची अनेकदा निराशा झाली आहे. वरळीच्या किल्लावर अनेक चित्रपटांचे शुटिंग होते परंतु परिसरात स्वच्छता मात्र होताना दिसत नाही. आजही कोळीवाड्यात रहाणारे अनेक वरळीकर असे आहेत जे अद्याप उघड्यावर शौचाला जातात. मुंबईसारख्या शहरात वरळीसारख्या ठिकाणी जेव्हा लोक उघड्यावर शौचाला जातात यासारखी लजस्पद बाब नाही. पालिकेच्या हलगर्जीपणामुळे लोकांना सध्या विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लाखो रूपयांचा शौचालय घोटाळा 2 ग्रामसेवक निलंबित

News Desk

नवी मुंबई महापालिकेवर आयकर विभागाची २४ तास झाडा-झडती

News Desk

सायन पनवेल महामार्गावर पाण्याची पाईप लाईन फुटली

News Desk