HW News Marathi
मुंबई

धूलिकणांनी मुंबईकरांचा श्वास कोंडला

मुंबई । मुंबईकर आॅक्टोबर हीटमुळे हवालदिल झाले आहेत. हीटबरोबर मुंबईकरांना धूलिकणांच्या त्रासाला सामना करावा लागत आहे. ‘सफर’ या संकेतस्थळ हवेतील धूलिकणाचा आढावा घेते, त्यांनी दिलेल्या अहवालानुसार वरळीत धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे. वातावरणातील धूलिकणांचे (पार्टिक्युलेटर मॅटर) प्रमाण वाढले आहेत. वरळीमध्ये धूलिकणांचे प्रमाण ३२२ वर पोहोचले होते. हे प्रमाण हवेच्या गुणवत्तेमधील सर्वात खराब प्रमाण असल्याचे सफर संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे.

मुंबई शहरातील माझगाव, कुलाबा, पश्चिम उपनगरातील बोरीवली, मालाड, अंधेरी, पूर्व उपनगरातील भांडुप, वांद्रे-कुर्ला संकुल, चेंबूर आणि नवी मुंबई येथे हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर घसरल्याची नोंद ‘सफर’ने केली आहे. वातावरणातील या स्थितीमुळे उंच इमारती धुरक्यात हरवल्याचे चित्र सध्या दिसूत आहे. विशेषत: सायंकाळसह मध्येरात्री उशिरापर्यंत वाहणाऱ्या गरम वा-यांमुळे मुंबईकर चांगलेच त्रस्त झाले आहेत. वातावरणात मोठ्या प्रमाणावर धूलिकण पसरल्याने वाहनचालकांना वाहने चालविणे कठीण झाले आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरातील धूलिकणांचे प्रमाण वाढतच राहिले तर पुढील दिवसात दोन्ही महामार्गांवर वाहन चालविण्यास वाहनचालकांना आव्हानात्मक होण्याची भीती वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.

हवेतील गुणवत्तेचे प्रमाण खालीलप्रमाणे

  • वरळी ३२२
  • अंधेरी १९४
  • वांद्रे-कुर्ला संकुल १६९
  • बोरीवली ११३
  • माझगाव १०९
  • भांडुप ९३
  • चेंबूर ७६
  • मालाड ७४
  • कुलाबा ७४
  • नवी मुंंबई १७८
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

रोटरी क्लबचा “लहान बालक हृद्यरोग शस्त्रक्रिया प्रकल्प’ कौतुकास्पद

News Desk

मालगाडीवर चढून सेल्फी काढताना १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

News Desk

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी स्ट्रक्चरल ऑडिटरला २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

News Desk