HW News Marathi
मुंबई

अरबी समुद्रातील शिव स्मारकाच्या उंचीला पर्यावरण खात्याची मंजूरी 

स्मारकाच्या निवीदांना पुढीला १५ दिवसात अंतिम मंजूरी

मुंबई – अरबी समुद्रात शिव छत्रपतींचे स्मारक उभारले जाणार आहे. त्यात अश्वारूढ शिव छत्रपतींच्या पुतळ्याच्या उंचीला केंद्रीय पर्यावरण खात्याची मंजूरी लालफितीमध्ये अडकली होती. मात्र सोमवारी या उंचीला पर्यावरण खात्याने मंजूरी दिली आहे. त्यामुळे या स्मारक उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शिवाय पुढील १५ दिवसात या स्मारकाचे कामाचे टेंडर अंतिम तीन कंपन्यां पैकी एका कंपनीला देण्यात येईल असे स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सांगितले.

अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारक हे जगातील सर्वात उंच स्मारक ठरणार आहे. शिवस्मारकाच्या उंचीबाबत राज्य सरकारने दिलेल्या प्रस्तावाला केंद्रीय पर्यावरण खात्याने मंजूरी दिली आहे. नव्या प्रस्तावा नुसार शिवस्मारकाची उंची १९२ मीटरऐवजी २१० मीटरपर्यंत वाढणार आहे. मारिन ड्राईव्हच्या किनाऱ्यालगत समुद्रात सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावरील १५.८६ हेक्टर जागेवर स्मारक हे उभारले जाईल. या स्मारकासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे २३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. जगभरातल्या पर्यटकांसाठी हे स्मारक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अल्पवयीन मुलावर १५ मित्रांकडून लैंगिक अत्याचार

News Desk

Dahi Handi | दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट, एका गोविंदाचा मृत्यू

News Desk

गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित

News Desk