HW News Marathi
मुंबई

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड

मुंबई | पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असूनमहालक्ष्मी स्टेशनजवळ ओव्हरहेड वायरवर केबल पडल्याने पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे पश्चिम रेल्वेच्या धीम्या आणि जलद मार्गावरील सर्व लोकल जवळपास ३५ मिनिटे थांबविण्यात आल्या होत्या. रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर काम करून ७ वाजून १० मिनिटांनी लोकलसेवा पूर्ववत करण्यात आली असली तरी हजारो प्रवाशांचे हाल झाले आहेत. चर्चगेट ते दादर स्टेशनपर्यंत सर्व स्टेशनांवर सध्या प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

महालक्ष्मी आणि मुंबई सेंट्रल स्टेशनदरम्यान बाहेरून जाणारी एक केबल पश्चिम रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर पडली. त्यामुळे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास संपूर्ण मार्गाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. या प्रकारानंतर पश्चिम रेल्वेच्या चारही मार्गांवरील लोकलसेवा ठप्प झाली. दादर ते चर्चगेट यादरम्यान सर्व गाड्या होत्या तिथेच थांबवण्यात आल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बेस्ट प्रवास महागला

News Desk

भीमा कोरेगाव च्या दंगलीचे डोंबिवलीत पडसाद

News Desk

मुंबईतील व्यापार आणि पर्यटनाला मिळणार चालना

News Desk