HW News Marathi
मुंबई

दिवा स्थानकात एक्स्प्रेसने दुचाकीला उडवले

ठाणे | दिवा स्थानकामध्ये आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. स्थानकाचे बंद फाटक ओलांडून जात असलेल्या दुचाकीला भरधाव एक्स्प्रेसने उडवल्याने हा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.

रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, या घटनेचा तपास करत आहेत. स्थानकातील फाटक बंद असताना दोन दुचाकीस्वार तरुणांनी फाटक ओलांडून पलिकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र यादरम्यान रेल्वे ट्रॅकवरून जात असलेल्या भरधाव एक्स्प्रेसने दुचाकीला उडवले. या अपघातात दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्रालयात कर्मचारी, अधिकारी यांना मास्कशिवाय प्रवेश नाही

News Desk

शेतकरी मोर्चावरून विरोधक आक्रमक, सरकारवर कडक टीका

News Desk

सुरक्षित ठिकाणी घर मिळण्यासाठी, माहुल प्रकल्पग्रस्तांचे १३ दिवसांपासून आंदोलन सुरू

News Desk