HW News Marathi
मुंबई

खंबाटा एव्हिएशनच्या कर्मचार्‍यांचे अनिश्चित कालीन उपोषण

मुंबई | खंबाटा एव्हिएशनच्या कंपनीच्या कर्मचार्‍यांना त्यांचा हक्क व देणी मिळवून देणाच्या मागणीसाठी नि:स्वार्थ कामगार संघटनेच्या वतीने आज १० ऑक्टोबर रोजी अनिश्चित कालीन उपोषणाला सुरुवात करण्यात आली. नि:स्वार्थ कामगार संघटनेच्या अध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या नेतृत्वाखाली ह्या आमरण उपोषणाला आज पासून सुरुवात करण्यात आली आहे. अलविटी हॉटेल, सहारा कार्गो परिसरात हे उपोषण करण्यात येत आहे.

“मार्च २०१६ पासून व्यवस्थापनाने वेतन व इतर देणी दिली नाहीत. याबाबत औद्योगिक न्यायालय व कामगार न्यायालयाने निर्देशन दिल्यानंतरही त्याचे पालन झाले नाही. या प्रश्नी सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे उपोषण आहे. तसेच जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तो पर्यंत उपोषण मागे घेणार नाही,” असे अंजली दमानिया यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात भाजप पराभूत- मुख्यमंत्र्यांना धक्का 

News Desk

इमारत, दरड कोसळून तीन ठार

News Desk

अंगणवाडी सेविकांचा मेस्मा काढण्यास सरकारचा पुन्हा नकार ; काय म्हणाले या चर्चेत धनंजय मुंडे

News Desk