HW News Marathi
मुंबई

फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर पुन्हा ‘राज’कारण

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेर आणि मागे पालिका हॉकर्स झोन उभारणार आहे. एम. बी. राऊत मार्ग आणि केळुसरकर मार्ग या दोन्ही रस्त्यावर २० फेरीवाल्यासाठी पट्टे आखण्यात आले आहेत. सध्या दोन्ही रस्त्यावर एक ही फेरीवाले बसत नाही. याविषयी कृष्णकुंजवर मनसे पदाधिकाऱ्यांची सकाळी बैठक बोलवण्यात आली होती.

या बैठकीत मनसेच्या शिष्ट मंडळाला हॉकर्स झोनमध्ये शाळा, रुग्णालयांची माहिती घेऊन यात कोणत्या नियमांचे उल्लंघन होत आहे का? होत असल्यास वॉर्ड ऑफिसरकडे तक्रार करावी असे आदेश देण्यात आले आहे. पालिका जाणीवर्पूवक राज ठाकरे यांच्या घराबाहेर फेरीवाल्यांना जागा दिल्याचा आरोप मनसे करत आहे.

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे फेरीवाल्यांचा विरोध केला असून यांच्या विरोधात निषेध रॅली देखील काढण्यात आली होती. त्यानंतर संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांची बाजू घेत मनसेला विरोध केला होता. पुन्हा एकदा फेरीवाल्यांचा मुद्दावरुन चांगलाच रंगणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई विद्यापीठाविरोधात विद्यार्थी न्यायालयात

News Desk

‘वारा’ संस्थेतर्फे सॅनेटरी नॅपकीनचे मोफत वितरण

swarit

मध्य रेल्वेची वाहतूक अद्याप विस्कळीतच

swarit