HW News Marathi
मुंबई

बुचर बेटावरील इंधनाच्या टाकीला भीषण आग

मुंबई बुचर बेटावरच्या समुद्रातील जवाहर द्वीपावर तेलाच्या साठा असणणा-या टाकीवर काल संध्याकाळी विज पडल्याने भिषण आग लागली आहे. काल संध्याकाळपासून आग विजवण्याचे काम अग्निशमक दल शर्यतीचे प्रयत्न करत आहे13 आणि 14 क्रमांकाच्या तेलटाक्यांना आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

भाऊच्या धक्क्यापासून अवघ्या काही अंतरावर समुद्रात असणाऱ्या जवाहर द्वीप बेटावरील डिझेल टँकच्या परिसरात वीज कोसळली आणि तेथे असलेल्या डिझेल टँक्सना आग लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर डिझेल जळून भस्मसात झाले आहे. या बेटावर 15 ते 20 टँक आहेत.

समुद्रातून तेल काढून मोठ्या जहाजाद्वारे जवाहर द्वीपवर आणली जातात. तेथे डिझेल साठवून ठेवले जाते. शुक्रवारी सायंकाळी मोठा पाऊस झाला आणि त्याचवेळी तेथे वीज कोसळली. त्यामुळे स्पार्किंग होऊन डिझेल टँकला आग लागली. काही वेळातच ही आग भडकली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापालिका, जि.प. आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले

News Desk

राज ठाकरेंच्या ‘शिवाजी पार्क दीपोत्सव’ कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna

मुंबईतील पाणी टँकरधारकांचा संप मागे

Aprna