HW News Marathi
मुंबई

बेस्ट संपाचा पाचवा दिवस, मुंबईकरांना एसटीची साथ

मुंबई | बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज (१२ जानेवारी) पाचवा दिवस आहे. बेस्टच्या या संपामुळे मुंबईकरांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागेल आहे. मात्र, या दिवसांमध्ये एसटीने मुंबईकरांना दिलासा दिला आहे. संपाच्या पाचव्या दिवशी देखील मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीने आज दिवसभरात तब्बल ९० बसेस वेगवेगळ्या मार्गावर सुरू ठेवल्या आहेत. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला नेहरूनगर , पनवेल, उरण ,व ठाणे आगारातून या एसटी बसची सेवा सुरु आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भांडुप ते कांजूरमार्गदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणातील तपासावर हायकोर्ट नाराज

swarit

मुंबईसह उपनगरात दमदार पाऊस

News Desk
राजकारण

…तर बेस्ट कर्मचाऱ्यांना मनसे स्टाईलने मिळवून देणार न्याय !

News Desk

मुंबई | “येत्या सोमवारपर्यंत (१४ जानेवारी) बेस्टच्या संपाचा तिढा सुटला नाही तर सोमवारपासून ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ आपल्या संपूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरून मनसे स्टाईलने आंदोलन करेल. याची सर्व जबाबदारी राज्य सरकार आणि बेस्ट प्रशासनाची असेल”,असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे. मुंबईत गेल्या पाच दिवसांपासून बेस्ट कर्मचाऱ्याचा संप सुरू आहे. अनेक बैठकांनंतर देखील अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही, अशी बेस्ट कर्मचाऱ्यांची ठाम भूमिका आहे.

आम्हाला मुंबईच्या जनतेला वेठीस धरायचे नाही. परंतु बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणे देखील महत्त्वाचे आहे, असेही संदीप देशपांडे यावेळी म्हणाले. काही दिवसांपूर्वी बेस्टचे शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ‘कृष्णकुंज’वर दाखल झाले होते. यावेळी राज यांनी त्यांना एकजूट कायम ठेवण्याचा सल्ला दिला होता. त्याचप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना आम्ही अखेरपर्यंत पाठिंबा असे म्हणत मनसेकडून पक्षाची अधिकृत भूमिका देखील स्पष्ट करण्यात आली होती.

Related posts

“…अफवांवर विश्वास ठेवू नये,” शिंदेंनी पवार भेटीचे वृत्त फेटाळले

Aprna

आता राज्याच्या आरोग्य खात्याचा अधिभार एकनाथ शिंदेंकडे 

News Desk

“उद्धव ठाकरेंना कंटाळून शिवसेनेतून 40 आमदार बाहेर पडले”, गिरीश महाजनांचा दावा

Aprna