HW News Marathi
मुंबई

लालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा संपन्न

मुंबई | नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेल्या मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागचा राजा गणेश मंडळाने यंदाच्या वर्षी ८६ व्या वर्षात पदार्पण केले आहे. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा आज (२० जून) पार पडला आहे. संकष्टी चथुर्तीच्या मुहूर्तावर राजाचे पाद्यपूजन केले गेले. अनेक भाविकांनी फुलांनी सजविलेल्या राजाच्या पायाचे दर्शन घेतले. या सोहळ्याला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

लालबागच्या राजाची मूर्ती त्याच ठिकाणी घडवली जाते. जवळपास ८६ वर्ष कांबळी कुटुंबीयांकडून ही मुर्ती साकारण्याची सेवा करण्यात येत आहे. आमच्या तिसर्‍या पिढीकडून मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. दरवर्षी लालबागच्या राज्याच्या मूर्तीचे वेगळे रुप पहायला मिळते. या सोहळ्याचे लाइव्ह दर्शन मंडळाच्या फेसबुक, युट्यूब पेज तसेच वेबसाइटवर करण्यात येत आहे. या वर्षीही पाद्यपूजन सोहळ्याला भक्तांची मोठी गर्दी झाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवाजी पार्कमध्ये कुरियर बॉयचा २ तरुणींवर पेनाने हल्ला

News Desk

महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणी स्थानकादरम्यान अडकली, घटनास्थळी एनडीआरएफ दाखल

News Desk

मुंबई पोलिसांच्या डोक्यावर लवकरच नव्या टोप्या

News Desk