HW News Marathi
मुंबई

वांद्रे येथील झोपडपट्टयांना आग

मुंबई | वांद्रे येथील शास्त्रीनगर परिसरात असलेल्या झोपडपट्टीला गुरुवारी (८ऑक्टोबर) रात्री मोठी आग लागली होती. ही आग शमवण्यासाठी अग्निशमन दलाचे १५ बंब घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्याच यश आले आहे. परंतु आगीचे कारण अजूनही अस्पष्ट आहे.

या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. काही दिवसांपूर्वी वांद्रे येथील नर्गीस दत्तनगर झोपडपट्टीत भीषण आग लागली होती. त्यांनतर वांद्रे पश्चिमेकडील लालमाती परिसरात ही आग लागली होती. वांद्रे येथील झोपडपट्टयांना आग लागण्याचे सत्र कायम सुरूच आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओमी कालानीचा भाजपा प्रवेश धमाका ठरणार की फुसका बार?

News Desk

झाड कोसळून सातरस्ता येथे दोन गाड्यांचे नुकसान

swarit

मुंबईची तुलना पटन्याशी सीएम यांना भोवणार का?

News Desk