HW News Marathi
मुंबई

पनवेलमध्ये वैदू नगर झोपडपट्टीला आग

पनवेल | पनवेल तक्का येथील वैदू नगर झोपडपट्टीला सोमवारी (३१ डिसेंबर) पहाटे सव्वा तीनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या ठिकाणी आग लागण्याची ही दुसरी घटना आहे.

घटनेची माहिती मिळताच पनवेल महानगरपालिकेसह कळंबोली, खारघर, वाशी या अग्निशामन दलाचे बंब या ठिकाणी आले होते. आग इतकी भीषण होती की, काही मिनिटात अनेक झोपडया जळून खाक झाल्या. धग दुसरीकडे पोहचू नये, यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास करत असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी अनिल जाधव यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्यांना महाराष्ट्रातील जनतेने ‘रोजगारमुक्त’ केले, त्यांनी ‘मोदीमुक्त भारता’ची मुक्ताफळे उधळली

News Desk

पुणे – सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर सहा जण जखमी

News Desk

मुंबईच्या महापौरांचे स्थलांतर आता राणीच्या बागेत

Gauri Tilekar