HW News Marathi
मुंबई

मुलुंडमध्ये सिलिंडर स्फोटामुळे आग

मुंबई | मुलुंड पूर्वेकडे असणाऱ्या नवघर गल्ली १ मधील झोपडपट्टीत २ सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (११ फेब्रुवारी) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. कॅम्पस हॉटेलजवळ असलेल्या झोपडपट्टीत हा सिलिंडर स्फोट झाला होता.

या घटनेची माहिती मिळाताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. अथक प्रयत्नानंतर ही आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. सुदैवाने सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत जीवितहानी झालेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अश्विनी बिंद्रे प्रकरणात जलद गतीने तपास करण्यात येईल गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील

News Desk

मुंबई पोलिसांना लोकल प्रवास मोफत

News Desk

परळ बसस्थानकात एसटीचा ७० वा वर्धापनदिन साजरा

News Desk