HW News Marathi
मुंबई

परळच्या क्रिस्टल टॉवरला आग

मुंबई | परळ येथील क्रिस्टल टॉवरच्या 12व्या मजल्याला बुधवारी सकाळी अचानक आग लागली आहे. सकाळी 8.30 च्या सुमारास ही आग लागल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

क्रिस्टल टॉवरच्या 12व्या मजल्यावर लागलेली ही दुस-या श्रेणीची आग आता तिस-या श्रेणीची झाली आहे. त्यामुळे इमारतीतील लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. तसेच अग्निशामक दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना पहायला मिळत आहेत.

परिसरात धुराचे साम्राज्य पसरल्यामुळे आजूबाजूच्या लोकांमध्ये भीतीदायक वातावरण पसरले आहे. मात्र क्रिस्टल टॉवरमध्ये अनेक नागरिक अडकले आहेत, सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे कारणही अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबई पोलिसांमुळेच ‘ती’ सुखरूप घरी पोचली

News Desk

सांताक्रूझ येथे गुजराल हाऊसला आग

News Desk

पुन्हा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

News Desk
राजकारण

कॉंग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन, वयाच्या 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

News Desk

मुंबई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे बुधवारी निधन झाले. कामत यांनी दिल्लीच्या चाणक्यपुरी येथील प्राइमस रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. कामत अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस आणि काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य देखील होते. 2014 पर्यंत उत्तर-पश्चिम मुंबईत ते कॉंग्रेसचे खासदार होते.

कॉंग्रेसने कामत यांना गुजरात, राजस्थान, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव येथील प्रभारी म्हणून अधिकार सोपविले होते. पण 2017 मध्ये कामत यांनी सर्व पदावरुन राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतरही पक्षाने त्यांना सरचिटणीस मानले होते.

Related posts

आदर्श घोटाळा प्रकरणी अशोक चव्हाण पुन्हा एकदा अडचणीत

News Desk

ठाकरेंच्या सभेपुर्वीच शिवसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी

News Desk

मोदींनी ‘आयएनएस विराट’प्रकरणी राजीव गांधींवर केलेले आरोप पूर्णपणे खोटे !

News Desk