HW News Marathi
राजकारण

अखेर प्रियांका चतुर्वेदी काँग्रेसमधून बाहेर पडल्या

नवी दिल्ली | काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी त्यांच्या हॅण्डलवरून पत्र लिहून पक्षातील सर्व पदाचा राजीनामा दिल्याचे पोटस्ट टाकली आहे. चुतर्वेदींनी त्यांच्या ट्वीटरवर करत काँग्रेसच्या सर्व पदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी लिहले आहे. चुतर्वेदी यांनी लोकसभा निवडणुकांच्या मध्यातच काँग्रेसला मोठा दणका मिळाला आहे. प्रियांका चतुर्वेदी यांनी राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून बायोमधून चक्क आपले काँग्रेस राष्ट्रीय प्रवक्ते पद हटविले आहे. प्रियांका यांनी नुकताच काँग्रेस, काँग्रेसमधील नेत्यांविषयी उघड नाराजी व्यक्त करत घरचा आहेर दिला.

प्रियांका चतुर्वेदी या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. विशेष म्हणजे आज दुपारी १.३० वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार असल्याने या बैठकीतच घोषणा होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांका चतुर्वेदी यांनी महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या गुंडांना पक्षात प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली होती. याबद्दल त्यांनी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी काँग्रेसच्या ट्विटर हँडललादेखील टॅग केले होते. यामुळे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना काँग्रेसमधील नाराजी समोर आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजय माकन यांचा दिल्ली काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा

News Desk

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना BMC निवडणूक एकत्र लढविणार; प्रकाश आंबेडकरांची माहिती

Aprna

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज

swarit