मुंबई | मुंबईतील पादचारी पुलांचा प्रश्न आता दिवसेंदिवस अधिक गंभीर होताना दिसत आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील माटुंगा येथील पादचारी पुलाला तडा गेल्याने पुल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी १५ जुलैपासून मुंबई महापालिकेने तडे गेल्याने पादचारी पुल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुल एका बाजुने खाली झुकल्याने पुल धोकादायक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पुल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
Mumbai: Part of the Matunga (west) foot over-bridge (FOB) has been closed to the public for the past two weeks after civic officials noticed cracks on it. pic.twitter.com/uZZY49yVor
— ANI (@ANI) July 18, 2018
माटुंगा रोड स्टेशनजवळील पादचारी पुलाला मोठा तडा गेल्याने पूल वापरासाठी बंद करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पुलाला तडा गेला होता, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेनं पूल वापरासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील माटुंगा स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी या पुलाचा प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे पुलाची लवकरात लवकर डागडुजी करून वापरासाठी खुला करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.