HW News Marathi
मुंबई

गणेश विसर्जनात डीजे-डॉल्बीवर बंदी कायम | उच्च न्यायालय

मुंबई | गणेश विसर्जनता डीजे आणि डॉल्बीवर मुंबई उच्च न्यायालय बंदी कायम ठेवली आहे. मुंबई हायकोर्टाने पाला म्हणजे प्रोफेशनल ऑडिओ आणि लायटिंग असोसिएशनने याचिका फेटाळून लावली आहे. ध्वनीप्रदुषणामुळे राज्य सरकारने डीजे आणि डॉल्बीला परवानगी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवात डीजे व डॉल्बीचा आवाज ऐकून येणार नाही. या याचिकेवर अंतिम सुनावणी ४ आठवड्यांनी होणार आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे बंदीला आव्हा देणाऱ्या याचिकेवर आज (शुक्रवारी) निकाल मुंबई उच्च न्यायालयाने हा दिला आहे. न्यायमुर्ती शंतनू केमकर आणि न्यायमुर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने हा निकाल जाहीर केला. डीजेची सिस्टिम सुरु करताच त्यांची किमान आवाज मर्यादा ही १०० डेसिबलपर्यंत असते.

गणेशोत्सव आणि अन्य उत्सवांत परवागी दिली जाऊ शकत नाही, अशी ठाम भूमिका याआधी राज्य सरकारच्या वतीने हायकोर्टात मांडण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर न्यायालयने डीजे व डॉल्बीवरील बंदी कायम ठेवली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

३० एप्रिल पर्यंत शाळा सुरु ठेवण्याचे पत्रक मागे

News Desk

मालाडमध्ये सिलिंडर स्फोटामुळे भीषण आग; 50 झोपड्या जळून खाक

Aprna

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

News Desk