HW News Marathi
मुंबई

दादर स्टेशनला डॉ आंबेडकरांचे नाव द्या | भीम आर्मी

मुंबई | दादरच्या चैत्यभूमी येथे 14 एप्रिल आंबेडकर जयंती निमित्त देशभरातून आलेल्या अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करण्यासाठी प्रचंड गर्दी केलेली पहायला मिळाली. बाबासाहेबांचे स्मारक इंदू मिल येथे व्हावे ही अपेक्षा व्यक्त होत असताना भीम आर्मी संघटनेकडून दादर रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असे नाव द्यावे अशी मागणी करण्यात आली.
भीम आर्मी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी शनिवारी दादर स्टेशन परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असे पोस्टर लावून दादर स्टेशनला डॉ आंबेडकर यांचे नाव द्यावे अशी मागणी केली. यावेळी भीम आर्मीचे मुंबई कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आंदोलन

swarit

प्रकाश आंबेडकरांनी धर्मनिरपेक्षतेचे धडे आम्हाला देऊ नयेत | पवार

Gauri Tilekar

गणेश विसर्जनानंतर गिरगाव चौपाटीची स्वच्छता

Manasi Devkar