HW News Marathi
मुंबई

हाजी अली दर्ग्याचे लवकरच होणार सौंदर्यीकरण

मुंबई | मुंबईतील सर्वच धार्मिक स्थळे ही महत्त्वाची आहेत त्यातीलच एक महत्त्वाचे धार्मिक व पर्यटन स्थळ म्हणजे हाजी अली दर्गा. या दर्ग्याचे नुतनीकरण व सौंदर्यीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी काल ( १२ फेब्रुवारी) दिले. मंत्रालयात श्री. शेख यांच्या अध्यक्षतेखाली हाजी अली दर्ग्याच्या नुतनीकरणाची आणि सौंदर्यी करणाची बैठक झाली.

हाजी अली दर्ग्याच रोज देशविदेशातील भाविक मोठ्या संख्येने येतात. पर्यटनाच्या दुष्टीने एक महत्त्वाचे स्थळ असल्याकारणाने या परिसराचे परिसराचे नुतनीकरण व सौंदर्यीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व परवाने तातडीने घेण्यात यावेत. तसेच सौंदर्यीकरणात बाधा येणारे या परिसरातील अनधिकृत बांधकामे काढून टाकण्याचीही कार्यवाही तातडीने करावी, असा आदेश श्री. शेख यांनी दिला.

शेख यांनी दर्ग्याचे नेमके नुतणीकरण का आणि कसे करायचे याची माहिती देत असताना यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, सह पोलीस आयुक्त नवल बजाज, मुंबई मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामास्वामी एन., हाजी अली दर्गाचे विश्वस्त मसूद हसम दादा, रिझवान मर्चंट, सुहेल खांडवानी, जफर शेख उपस्थित होते.

कसे असेल हाजी अली दर्ग्याचे नुतनीकरण आणि सौंदर्यीकरण

  • मुख्य रस्त्यावर भव्यदिव्य बुलंद दरवाजा उभारणार
  • मुघल गार्डनमध्ये प्राचीन काळाची आठवण करून देणारे बाकडे, लाईट यांची व्यवस्था
  • विविध फुलांची झाडे असलेल्या मुघल गार्डनची निर्मिती
  • मुख्य रस्ता ते दर्गा या मार्गाचे नुतनीकरण करून सुंदर रस्ता होणार
  • दर्गाचे मुख्य दरवाजाचे सौंदर्यीकरण
  • भाविकांसाठी विशेष सोयीसुविधासाठी ‘व्हिजिटर प्लाझा’

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजा उदार झाला आणि हाती भोपळा आला, ही म्हण केंद्राला तंतोतंत लागू होते – रोहित पवार

News Desk

फेरीवाल्यांविरुद्ध लढण्यापेक्षा सीमेवर जाऊन लढा. –रामदास आठवले

News Desk

विघटनवादी शक्तींना सत्तेवरून दूर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीः खा. अशोक चव्हाण

swarit