HW News Marathi
मुंबई

रविवारी बेस्टचा संप तर रेल्वेचा मेगाब्लॉक, मुंबईकरांचे हाल

मुंबई | बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संपाचा आज (१३ जानेवारी) सहा दिवस आहे. तर रेल्वेच्या पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी बेस्टचा संप आणि त्यातच दोन्ही मार्गावर ब्लॉक असल्याने प्रवाशांना प्रवास करणे कठीण होणार आहे. त्यामुळे रविवारी सुट्टीच्या दिवशी बाहेर जाण्याचा बेत असल्यास रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावे. रेल्वे ब्लॉक आणि बेस्ट रस्त्यावर नसल्याने मुंबईकरांचे आज हाल होणार आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकादरम्यान सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत ब्लॉक घेणार असल्याचे जाहीर केले आहे. तर मध्य रेल्वे मार्गावरील बदलापूर-कर्जत दरम्यान पायाभूत सुविधेसाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी १०.४५ ते दुपारी २.४५ पर्यंत कर्जत दिशेकडे जाणाऱ्या लोकल आणि सकाळी १०.४५ ते दुपारी ३.१५ पर्यंत सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या लोकल सेवेवर याचा परिणाम हेणार आहे. रेल्वेने मुख्य मार्ग हार्बर मार्ग आणि ट्रान्सहार्बर मार्गावर ब्लॉक घेणार नसल्याचे जाहीर केले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपाच्‍या उमेदवारी निवडीची प्रक्रिया पारदर्शी पध्‍दतीने

News Desk

रामनाथ मोतें, शेषराव बीजवार यांची शिक्षक परिषदेतून हकालपट्टी

News Desk

‘दमण’च्या नागरिकाने रेल्वे मंत्र्यांना केले होते सावध

News Desk