मुंबई | कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता देशातला लॉकडाऊन हा ३ मेपर्यत वाढवल्याची घोषणा काल (१४ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मेदी यांनी केली. या लॉकडाऊनमूळे आधीच मजूरांना फटका बसला होताच त्यात भर पडली. दरम्यान, लॉकडाऊन वाढवल्याने रेल्वे सेवाही बंदच असणार आणि त्यामूळे या मजूर वर्गाला आपापल्या गावी जाता येणार नसल्याकारणाने काल (१४ एप्रिल) वांद्रा रेल्वे स्थानकाबाहेर असंख्य मजूर गावी जाण्यासाठी हटून बसले होते.
काल झालेल्या या प्रकरणावर कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरद्वारे केंद्र सरकारवर टीका केली. २४ तासांसाठी का होईना पण रेल्वे सेवा सुरु करावी असे त्यांचे म्हणणे होते. या मजूरांना अन्नापेक्षा घरी जाणे जास्त महत्त्वाचे आहे. असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.
The current situation at Bandra Station, now dispersed or even the rioting in Surat is a result of the Union Govt not being able to take a call on arranging a way back home for migrant labour. They don’t want food or shelter, they want to go back home
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 14, 2020
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या या ट्विटला भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग याने आपले मत मांडले आहे. सद्य स्थिती पाहता देशात कर्फ्यू लावणेच योग्य आहे. बांद्रा येथे झालेला प्रकार अयोग्य आहे. हे सगळे स्वत:चे आणि इतरांचे जीव धोक्यात घालत आहेत, अशा आशयाचे ट्विट करत आदित्य ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांना हरभजनने टॅगही केले आहे.
Curfew is the only option to keep everyone inside..what happened in Bandra today is unacceptable.. people not understanding the situation..putting their life and many others in danger.😡😡😡😡 @narendramodi @AUThackeray
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) April 14, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.