HW News Marathi
मुंबई

देहविक्री रोखण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांचा पुढाकार

मुंबई : पळवून आणलेल्या महिलांना अनेक हॉटेल, लॉजमध्ये बळजबरीने देहविक्री करण्यास भाग पाडले जाते. अनेकदा या काळ्या धंद्यांशी हॉटेल व्यावसायिकांचा काहीही संबंध नसतो, तरीही ते बदनाम होतात. त्यामुळे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या अनैतिक व्यावसायाला पायबंद घालण्यासाठी आता हॉटेल व्यावसायिकांनीच पुढाकार घेतला आहे. एखादे संशयास्पद जोडपे आढळल्यास काय पावले उचलायची याबाबत आता हॉटेल कर्मचाऱ्यांनाच प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

राज्य महिला आयोग आणि हॉटेल व्यवसायिक संघटनेत याबाबत गेल्या आठवड्यात एक करार झाला. त्यानुसार हॉटेल कर्मचाऱ्यांना मानवी तस्करी आणि वेश्या व्यवसाय रोखण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच ‘रेस्क्यू मी’ नावाचे अॅपही तयार केले जाणार असून त्याद्वारे हॉटेल कर्मचारी संशयास्पद ग्राहकाची माहिती त्याच्या रुम नंबरसकट पोलिसांना कळवू शकणार आहेत. एका आंतरराष्ट्रीय संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी १५० अब्ज डॉलर्सची उलाढाल केवळ मानवी तस्करीतून होत असते. तसेच सुमारे २ कोटी लोक या तस्करीला बळी पडतात. यात महिला आणि मुलांची संख्या मोठी आहे. तस्करी करण्यात आलेल्या महिला, मुली, बालके ही जगभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये पाठवली जातात. त्यासाठी स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अशी वेगवेगळ्या पातळींवर रॅकेट कार्यरत असतात. ज्याची पोलीस यंत्रणांनाही माहिती नसते. काही वेळा धडक कारवाई करून पोलीस असे रॅकेटचा बिमोड करतात. तरीही त्याला पूर्ण पायबंद घालणे पोलिसांना अद्याप शक्य झालेले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी सलमान खानविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

News Desk

भीमा कोरेगाव प्रकरण गुन्हे घेणार मागे, ९ कोटी ४५ लाखांची करणार भरपाई

News Desk

स्वच्छतागृहातच कैदी आत्महत्या का करतात 

News Desk