HW News Marathi
मुंबई

या अधिकाऱ्यांना POKमध्ये पाठवा !

मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेड साठी आरे कॉलनी येथील वृक्षतोड करण्यास सुरुवात झाली आहे. वृक्षतोड करण्याच्या विरोधात आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत. आदित्य ठाकरेंनी वृक्षतोडीवरून मेट्रो अधिकाऱ्यांवर तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे.

याविषयी बोलताना ठाकरे यांनी ज्या तत्परतेने मेट्रोचे अधिकारी आरे काॅलनीतील झाडं तोडत आहेत ते पाहता त्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवा. तसेच आरेमधील जैवविविधता संपवण्याचा हा जो घाट रचला आहे तो लज्जास्पद आहे अशा शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. झाडं तोडण्यापेक्षा या अधिकाऱ्यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ नष्ट केले तर अधिक बरं होईल ना? असं ठाकरे म्हणाले आहेत.

राज्य सरकारला आरेतील कारशेड प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडवरिधातील दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. मेट्रो कारशेडसाठी आरेतील तब्बल अडीच हजार झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. याविरोधात अनेक पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. मात्र, या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात काल (४ ऑक्टोबर ) सुनावणी दरम्यान सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत.

शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव यांना, जे वृक्ष प्राधिकरणात सदस्यही आहेत, त्यांना न्यायालयाने ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. आरेतील कारशेड उभारणीसाठी झाडांची कत्तल रोखण्यासाठी पर्यावरणवादी, स्थानिक आणि सेलिब्रिटीनी रस्त्यावर उतरुन विरध प्रदर्शन केला जात आहे. मात्र, राज्य सरकार आरेत मेट्रोचे कारशेडवर उभारण्यासाठी ठाम होते. न्यायालयाची परवानगी मिळाल्या नंतर कालरात्री झाडे कापण्यास सुरवात झाली आहे. आरे च्या काही भागात कलाम १४४ लागू करण्यात आले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकल मधून पडून एकाचा मृत्यू, दोन जण जखमी

News Desk

मनसे कार्यकर्त्यांकडून गुजराती पाट्यांची तोडफोड

News Desk

शरद पवारांविषयी केलेलं ते वक्तव्य संजय राऊतांना भोवलं,राऊत शिवसेनेत आहेत का राष्ट्रवादीमध्ये ?कॉंग्रेसचा सवाल

News Desk