HW News Marathi
मुंबई

हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई ओशिवरा पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.चित्रपटात करियर करण्यासाठी आलेल्या तरूणीने सेक्स रॅकेट चालवचत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुंबईत अभिनेत्री होण्यासाठी आलेल्या तरूणींना विश्वासात घेऊन त्यांना सेक्स रॅकेटमध्ये ढकलत होती.याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी खात्री करून बुधावारी कारवाई केली.

पोलिंच्या माहितीनुसार 22 वर्षीय मॉडेल मूळची पश्चिम बंगालमधील आहे. चार वर्षापूर्वी ती अभिनेत्री होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आली होती. मात्र, तिला म्हणावा तसा ब्रेक मिळत नव्हता. छोट्या मोठ्या भूमिका आणि स्टेज शो करून ती आपला उदरनिर्वाह करत होती. मात्र काम मिळत नसल्याने सध्या ती ओशिवरा परिसरात बॉयफ्रेंडसोबत राहते. पैशाची कमतरता पडू लागल्यामुळे ती कॉलगर्ल म्हणून काम करू लागली. पुढे तिने बॉयफ्रेंडला विश्वासात घेऊन सेक्स रॅकेट चालविण्याची कल्पना मांडली. यातून बक्कळ पैसे मिळत आहेत. होतकरू व आर्थिक चणचण भासत असलेल्या नवोदित तरूणी, मॉडेल यांना गाठून त्यांना चित्रपटात काम मिळेपर्यंत स्टेज शो वगैरेतून पैसे कमवा असा सल्ला देऊन त्यांना जवळकी करून नंतर मॉडेलना सेक्स रॅकेटमध्ये ढकलायची. याद्वारे तिने चांगलेच बस्तान बसविले होते. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा करून घेतली. एका मुलीसाठी 30 हजार रूपये याप्रमाणे तिने सौदा ठरवला. त्यानुसार ओशिवरा येथील लव्ह लेट कॉफी शॉप येथे मुलींना पाहण्यासाठी बोलावले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.

मॉडेलने वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या तरूणींना ओशिवरा पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता. यावेळी मॉडेलच्या मोबाईलमध्ये सेक्स रॅकेटशी संबंधित अनेक मॉडेलचे नंबर मिळाले. ताब्यात घेतलेल्या मॉडेलपैकी एक दिल्लीची तर दुसरी यूपीतील आहे. व्हॉट्स अॅप ग्रुपच्या माध्यमातून या मुली एकमेंकांच्या संपर्कात होत्या. ताब्यात घेतलेल्या तरूणींनी आपण संबंधित मॉडेलच्या सांगण्यावरून एका पंचतारांकित हॉटेलात वेश्या व्यवसाय करण्यासाठी जात असल्याचे सांगितले. याप्रकऱणी पोलिसांनी मॉडेवर गुन्हा दाखल करून अटक असून पीडित मुलींना मानखुर्द सुधारगृहात रवाना केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडले

News Desk

लोअर परळचा पूल आजपासून बंद, चाकरमान्यांचे हाल

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, विठ्ठलवाडी-कल्याणदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली

News Desk