HW News Marathi
मुंबई

अंधेरी पश्चिम परिसरातील ११ उपहारगृहांमधील अनधिकृत बांधकामे तोडली

मुंबई | अंधेरी पश्चिम परिसरातल्या विविध उपहारगृहांमधील अनधिकृत बांधकामांवर तोडकाम कारवाई सुरु असून आतापर्यंत ९ उपहारगृहांमधील एकूण १५ हजार चौरस फुटांपेक्षा अधिक बांधकाम तोडण्यात आले आहे. यामध्ये इंडिपेंडट ब्रेवरीज स्पेस बार लिटल डोअर कॅलिडो , ब्र्यूबॉट, ऑटम , ग्लोकल जंक्शन , बी देसी , बियॉण्ड बार या उपहारगृहांचा समावेश आहे. तर कारवाई अंतिम टप्प्यात असलेल्या २ उपहारगृहांमध्ये राईक टेरेस बार व बार्बेक्यू नेशन यांचा समावेश आहे. परिमंडळ – ४ चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आलेल्या या कारवाई दरम्यान प्रामुख्याने उपहारगृहांमधील मोकळी सोडणे आवश्यक असलेल्या जागेत करण्यात आलेली विविध प्रकारची बांधकामे तोडण्यात आली आहेत, अशी माहिती ‘के पश्चिम’ विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.

पालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागांतर्गत जुहू, जोगेश्वरी (प.), अंधेरी (प.), विलेपार्ले (प.), जुहू समुद्रकिनारा, ओशीवरा, वर्सेावा व वर्सेावा समुद्र किनारा इत्यादी परिसरांचा समावेश होतो. याच ‘के पश्चिम’ विभागातील विविध उपहारगृहांमधील मोकळ्या जागेतील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. मुंबई पोलीस दलाच्या विशेष सहकार्याने पालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागाद्वारे करण्यात येत असलेल्या या कारवाई करिता २५ पोलिसांचा ताफा संबंधित घटनास्थळी तैनात असून या कारवाईत पालिकेचे २० कामगार – कर्मचारी – अधिकारी देखील सहभागी झाले आहेत. या कारवाईसाठी १ जेसीबी, २ ‘लॉरी’ वाहने, गॅस कटर, हातोडे, घण व इतर आवश्यक साधनसामुग्री वापरण्यात येत असून अनधिकृत बांधकामांवरील ही धडक कारवाई यापुढेही सुरु राहणार आहे, अशीही माहिती सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कल्याण-डोंबिवली पालिकेचे मुख्यालय अनिधकृत

News Desk

मुस्लिम ओबीसी समाजाच्या प्रश्नांसंदर्भात शासन सकारात्मक – राजकुमार बडोले

News Desk

केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांनी घेतली ८ लाखांची लाच

News Desk