HW Marathi
मुंबई

मुंबईत कांद्याचे दर घसरले, कांद्याची आवक वाढली

मुंबई | हिवाळा सुरू झाल्यापासून मुंबईमध्ये भाजीपाल्याचे दर घसरू लागले आहेत. त्यामुळे कोबी, वांगी, फ्लॉवर उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहेत. यामध्ये आता कांदा उत्पादकांची देखील भर पडली आहे. सध्यामध्ये मुंबई बाजार समितीमध्ये रोज १००० ते ११०० टन कांदा आवक होत आहे.

उन्हाळी कांदा २ ते ६ रुपये किलो दराने विकला जात आहे. चांगला बाजारभाव मिळेल या आशेने चाळींमध्ये ठेवलेल्या मालाचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नवीन मालाला १३ रुपयांपर्यंत दर मिळत आहे. बटाट्याचे दरही होलसेल मार्केटमध्ये ७ ते १८ रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

सद्य:स्थितीमध्ये साडेसात लाख जुडी पालेभाज्या व २३०० टन भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये होत आहे. फळ मार्केटमध्ये सरासरी १३०० टन कृषी मालाची आवक होत असून, कलिंगड व मोसंबीची सरासरी २५० टन आवक होत आहे. कलिंगड ७ ते ११ रुपये किलो विक्री होत आहे.

Related posts

ओला-उबरचा संप अखेर मागे

अपर्णा गोतपागर

उंदीर मारण्याचे काम १९८४ पासून सुरू

News Desk

लोअर परळचा पूल आजपासून बंद, चाकरमान्यांचे हाल

News Desk