HW News Marathi
मुंबई

मुंबईत वरुणराजाची हजेरी

मुंबई | गरमीने हैरान झालेल्या मुंबईकरांना बुधवारी काही अंशी दिलासा मिळाला आहे. मुंबईत दादर, प्रभादेवी, परळसह गिरणगावात अन्य काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी बरसल्या आहेत. गेलया दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण मुंबईत पहायला मिळत होते त्यातच उकाडा अधिक वाढल्यामुळे मुंबईकर उकाड्याने त्रस्त होते. बुधवारी वरुण राज्याने लावलेल्या हजरेमुळे मुंबईकर काही प्रमाणात नक्कीच आनंदी झालेले आहेत.

पावसाच्या अगदी हलक्या सरी बरसल्या असल्या तरीही सकाळपासूनच सर्वत्र वातावर ढगाळ आहे. घरासमोर, रस्त्यावर पाणी शिंपडावे अशा स्वरुपाचा हा पाऊस असला तरी मुंबईकर मात्र नक्कीच सुखावलेले पहायला मिळत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

वरळीतील कोरोनाबाधितांसाठी पोदार रुग्णालयात सुरु केले स्वतंत्र कोरोना कक्ष

News Desk

डॉक्टरावर कोयत्याने हल्ला

News Desk

मुंबईत जोरदार पाऊस, रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk
महाराष्ट्र

काँग्रेसला संपविण्याची भाषा करणा-यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी सज्ज व्हा!: खा. अशोक चव्हाण

swarit

 

लातूर देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊन देशात लोकशाही रूजवण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले आहे. मात्र आज सत्तेवर आलेले लोक काँग्रेस संपवण्याची भाषा करित आहेत. त्यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले. ते लातूर येथे काँग्रेसच्या जिल्हास्तरीय शिबिरात बोलत होते.

यावेळी बोलताना खा. अशोक चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांवर जोरदार टीका केली. खोटी जाहिरातबाजी, फसवी आश्वासने देण्यापलीकडे सरकारने साडे तीन वर्षात काहीच काम केले नाही. आपल्या पक्षीय स्वार्थासाठी समाजात तेढ निर्माण करण्याचा सत्तेत बसलेल्या लोकांचा डाव आहे. भीमा कोरेगावची दंगल याचेच उदाहरण आहे. या दंगलीतला आरोपी संभाजी भिडेला पद्मश्री देण्याची शिफारस राज्य सरकारने कोली होती अशी बातमी वर्तमानपत्रात आली आहे. भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी भिडेला अटक का केली जात नाही, असा सवाल खा. चव्हाण यांनी केला. समाजातील सर्वच घटकांत सरकारविरोधात तीव्र असंतोष आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकांचा आवाज बनून रस्त्यावर उतरून सरकारविरोधात तीव्र संघर्ष करावा असे आवाहन खा. चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना केले.

याशिबिराला देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, डॉ. रत्नाकर महाजन, उल्हार पवार, दिलीप देशमुख, बस्वराज पाटील, अमित देशमुख, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व्यंकट बेद्रे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुनिताताई आरळीकर यांनी मार्गदर्शन केले.

प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व सोशल मिडीयाचे प्रमुख अभिजीत सपकाळ यांनी सादरीकरण केले.

या मेळाव्यापूर्वी खा. अशोक चव्हाण यांनी बाभळगाव येथे जाऊन राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्याबरोबर देशमुख कुटुंबिय व पक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, माजी आ. शिवाजीराव कव्हेकर, धिरज देशमुख, रविंद्र दळवी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे, रामकिसन ओझा, सचिव आबा दळवी, शाह आलम यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनायकराव देशमुख यांनी सूत्रसंचालन केल व लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख यांनी आभार मानले.

Related posts

Maharashtra Budget 2021-2022 : राज्यात कृषीपंप जोडणी धोरण राबवणार, महावितरणला १५०० कोटी रुपये प्रस्तावित

News Desk

पोलिसांच्या आहार भत्त्यात वाढ

News Desk

आता मराठ्यांच्या गनिमी कावा आंदोलन

News Desk