मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटर अकाऊंट सुरु केले आहे. आजपासून (1 मे) महाराष्ट्र दिनापासून ट्विटरवर सक्रीय झालेल्या राज यांनी आपल्या पहिल्या ट्विट मध्ये महाराष्ट्रातील तमाम जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पहिल्या ट्विटमध्ये राज ठाकरे लिहितात, आज महाराष्ट्र दिन ! आज मराठी माणसाला त्याच्या हक्काचं राज्य मिळालं आणि एका अर्थानं मराठी भाषेला मान्यता मिळाली. हे राज्य मिळवण्यासाठी अनेका-अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, अपार कष्ट झेलले. आज त्या सर्वांची आठवण करण्याचा आणि आपली जबाबादारी जाणण्याचा दिवस! जय महाराष्ट्र ! असे त्यांनी या ट्विटमध्ये लिहीत शुभेच्छा दिल्या आहेत.
राज ठाकरे फेसबुक नंतर आता ट्विटरवर सक्रीय झाले आहेत त्यामुळे फेसबुक प्रमाणे आता ट्विटरवरही ते विविध विषयांना वाचा फोडणार का ? याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज महाराष्ट्र दिन ! आज मराठी माणसाला त्याच्या हक्काचं राज्य मिळालं आणि एका अर्थानं मराठी भाषेला मान्यता मिळाली. हे राज्य मिळवण्यासाठी अनेका-अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, अपार कष्ट झेलले. आज त्या सर्वांची आठवण करण्याचा आणि आपली जबाबादारी जाणण्याचा दिवस! जय महाराष्ट्र !
— Raj Thackeray (@RajThackeray) May 1, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.