HW News Marathi
मुंबई

आधुनिक यंत्र युगातही वाचन संस्कृती लोप पावणार नाही …

मुंबई | मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुवर्णवर्षमहोत्सवीवर्ष सोहळ्यानिमित्त एक दिवसीय साहित्य संमेलन विलेपार्ले येथील प्रबोधन क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आले होते. या वेळी व्यावसायिक प्रसाद पाटील, स्वागताध्यक्ष डॉ. पुष्पा रमेश प्रभू, संमेलनाध्यक्ष विनय खडपेकर, संमेलनप्रमुख माधवी कुंटे, प्रमुख पाहुणे सुमेध रिसबुड, विशेष अतिथी स्मिता भागवत, प्रायोजक डॉ. अरविंद प्रभू, आयोजक रेखा नार्वेकर, जेष्ट साहित्यिक डॉ. विजया वाड, माहिती आणि जनसंपर्क विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ आदी. मान्यवर उपस्थित असून यावेळी या मान्यवरांचा सत्कार करण्यात आले व यावेळी माधवी कुंटे यांच्या चौर्याहत्तरव्या जीवन मूल्य ह्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच स्मरणिकेचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन लता गुठे यांनी केले होते.
या एक दिवसीय साहित्य सोहळ्याची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे प्रस्तावना वाचण्यात आली. प्रस्तावनेत त्यांनी ग्रंथालयाच्या सूवर्णमहोत्सवी वर्षा बद्दल शुभेच्या दिल्या व ते म्हणाले भावी पिढयांना दुर्मिळ ग्रंथसंपदा उपलब्ध होण्यासाठी पुस्तकांचे डिजिटलायझेशन ग्रंथालय होणे गरजेचे आहे. तसेच मधू मंगेश कर्णिक यांनीही ग्रंथालयाच्या सूवर्णमहोत्सवी वर्षा बद्दल शुभेच्या पाठवल्या.
कार्यक्रमात मान्यवरांचे भाषण, सवांद कार्यक्रम, कथा वाचन, कथारंगसत्र व कविता वाचन याप्रकारे कार्यक्रमाचे चार सत्रात विभाजन करून अतिशय नियोजनपणे हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात विविध मान्यवरांनी आपले मनोगत सादर केले. या वेळी बिल्डर्स प्रसाद पाटील म्हणाले श्रीमान योगी मुळे माझ्या वाचनाची आवड निर्माण झाली. ऑनलाईन पुस्तकामुळे पुस्तकांची गोडी कमी होईल असा मला वाटत नाही. भावार्थदीपिका हा ग्रंथ प्रत्येक घरात असायला हवा व तो वाचल्यावर कोणीही आत्महत्या करणार नाही असेही ते ह्यावेळी म्हणाले. विशेष अतिथी स्मिता भागवत म्हणाल्या माझे वडील म्हणायचे वाचणारे वाचतात म्हणून लिहिणारे लिहितात. आयोजक रेखा नार्वेकर म्हणाल्या साहित्य सुंस्कृती टिकवायची असेल तर त्याचे वाचन होणे तितकेच महत्वाचे आहे. प्रमुख पाहुणे सुमेध रिसबुड म्हणाले ग्रंथ हे स्वप्नरंजन करतात व मनात नाना प्रकारची स्वप्न रंगवतात. जेष्ट साहित्यिक डॉ. विजया वाड आम्ही असू नसू पण ग्रंथ तर चालतच राहणार. संमेलनाध्यक्ष विनय खडपेकर म्हणाल्या ग्रंथ संग्रालय व मराठी संसुकृतींनी हातात हात घालून चालले पाहिजे.
कार्यक्रमांच्या दुसऱ्या सत्रात पुस्तक वाचन काल आज आणि उद्या यामध्ये सहभागी झाले, संपादक, आम्ही पार्लेकर ज्ञानेश चांदेकर, जेष्ठ पत्रकार संजीव लाटकर, जेष्ठ नाट्यकर्मी चिन्मयी सुमित, ग्रंथपाल मंजिरी वैद्य, बुक शेअर इंडिया सहसंस्थापक परशुराम खवले. या चर्चासत्रात पुस्तक वाचन व आधुनिक वाचन यावरील वाद रंगला शेवटी या चर्चासत्राचा निष्कर्ष निघाला की पुस्तकी वाचन लोप पावणार नाही तसेच जरी ज्ञान ग्रहण करण्याचे माध्यम जरी बदलले तरी वाचन सुंस्कृती लोप पावणार नाही.
तिसऱ्या सत्रात कथा रंग, कथाकथन, कथा-नाट्य अभिवाचन, ललित लेखवाचन हे कार्यक्रम सादर करण्यात आले यात रेखा नार्वेकर यांचे गूढकथा – आणखी एक, दीपा मंडलिक यांची वासू बँकेत जाते, लीना माटे यांचे ललित लेख वाचन व्हॅलेंटाईन डे, माधवी कुंटेच्या बूमरॅन्ग या नाटकाचे कथावाचनाने लोकांची मने जिंकली
शेवटच्या सत्रात काव्य वाचन सादर करण्यात आली कवींनी आपल्या कविता सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कविता मध्ये आशय, लय, प्रतिमा, अचूक शब्दकळा तसेच वास्तव्याचे भान असणे महत्वाचे असते असे मत गौरी देशपांडे यांनी मांडले.
एकदिवसीय साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्यानुभव वाचकांना घेता आला. या संमेलनाच्या माध्यमातून साहित्यिकांना अधिकाधिक वाचनसोबत संवाद साधता आला.
कार्यक्रमाची सांगता करताना लता गुठे मान्यवरांचे व प्रेक्षकांचे आभार मानले व त्या म्हणाल्या मला बोलता येत नाही पण कृतीतून काम करता येते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उपकार प्राप्त इमारतींना आकारण्यात येणारा वाढीव सेवाशुल्क कर रद्द; उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Aprna

पुणे डंपरच्या धडकेत युवती ठार

News Desk

सोनिया गांधींच्या विरोधात केलेल्या विधनाबाबत मुंबईत उद्या अर्नब गोस्वामींची पुन्हा चौकशी होणार

News Desk