HW News Marathi
मुंबई

इंद्रायणीने पती पीटरला घटस्फोटाची नोटीस पाठवली

मुंबई | शीना बोरा हत्याकांडमधील मुख्य आरोपी इंद्रायणी मुखर्जीने पती पीटरला स्पीड पोस्टने घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. या दोघांनी प्रेम विवाह केल्याचे नोटीसमध्ये नमुद आहे. इंद्रायणीने संपत्तीचा अर्धा हिस्सा मागितला आहे. पीटर आणि इंद्रायणीचे २००२ रोजी हिंदू पद्धतीने विवाह झाला होता.

दोन वर्ष तुरुंगवात काढल्यानंतर इंद्रायणीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. इंद्रायणीने पीटरला दोन पानाची नोटीस पाठवली आहे. घटस्फोटासाठी एकमेंकांविरोद्धात कुठल्याही न्यायालयात अर्ज न करता सांमजस्याने घटस्फोट घेण्यात यावा. यासाठी इंद्रायणीनेनोटीस पाठवली आहे. २०१५मध्ये शीना बोरा हत्याकांड प्रकरणी दोघांना अटक झाली आहे. इंद्रायणीने संपत्तीवरुन स्वत:च्या मुलीची हत्या केल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता पुन्हा मुंबईत ‘ट्राम’ दर्शन

News Desk

शक्ती मिल बलात्कारप्रकरणी आरोपींना फाशी शिक्षा कायम | मुंबई उच्च न्यायालय

News Desk

कपाडिया नगर परिसरातील पुलाचा भाग कोसळला

swarit