HW News Marathi
मुंबई

जे.डब्लू. मॅरियेट हॉटेलच्या जेवणातून डॉक्टरांना विषबाधा, सोल्यूशन ग्रुप इंडियाचा आरोप

मुंबई | जगभरातील डायबिटीजचे वाढते प्रमाण पाहता. डायबिटीजवर नियंत्रण मिळविण्याकरिता जगभरातील अनेक डॉक्टर रिसर्च करत आहेत. यासाठी गेल्या सहा वर्षापासून सोल्यूशन ग्रुप इंडियाच्या वतीने ‘चॅलेंज इन डायबिटीज’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा देखील चॅलेंज इन डायबिटीजचे आयोजन १९ एप्रिलपासून ते २१ एप्रिलपर्यंत करण्यात आले होते. या कार्यक्रमात जगभरातील २००० डॉक्टर सहभागी झाले होते. डायबिटीजवरील औषध आणि उपायोजनांवर चर्चा करण्यात येते. या कार्यक्रमाचे आयोजन जे.डब्लू. मॅरियेट येथे करण्यात आले होते.

 

मात्र, कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून आलेल्या डॉक्टरांना हॉटेलमधील जेवणातून विषबाधा झालेल्यामुळे त्यांना उलटी, अतिसार आणि पोटांच्या विकार आदी त्रास जाणवू लागले. यामुळे यंदाचे चॅलेज इन डायबिडीज चर्चेत आल्याचे पाहायला मिळाले. या घटनेनंतर सोल्यूशन ग्रुप इंडियाच्या वतीने हॉटेल प्रशासनाला कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली असून हॉटेलकडून अद्याप याबद्दल कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आले नाही. ” २० एप्रिल रोजी कार्यक्रमादरम्यान एका मार्गदर्शकाने हे अन्न शिळे असून त्यातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर सोल्यूशन ग्रुप इंडियाकडून तातडीने त्यावेळी ऑन ड्युडीवर असलेल्या आचारी (शेफ) नयन सिंग याला बोलवून जेवणाबाबातची सर्व माहिती देण्यात आली. परंतु सिंग यांनी सांगितले की, राईचे तेल वापरल्याने वास येत असावा त्यांनी सांगितले. आम्ही सर्वांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत जेवण केले, असे सोल्यूशन ग्रुप इंडियाचे मॅनेजिग पार्टनर राजेश कोविल यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी संवाद साधताना सांगितले आहे.”

या कार्यक्रमानंतर २१ एप्रिलच्या पहाटे डॉ. ज्योतिदेव यांना उलटी आणि अतिसार आणि पोटाचे विकाराच्या झाल्याची तक्रार त्यांनी केल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. ज्योतिदेव यांची अवस्था बिघडल्यामुळे त्यांना अंधेरी पूर्व येथील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आला यावेळी ज्योतिदेव यांच्या व्यतिरिक्त ५ ते ६ डॉक्टरांना देखील असाच त्रास जाणवू लागला होता. त्यावेळी त्यांना जेवणातून ही बाधा झाले असल्याचे कळाले. त्यानंतर त्यांनी हॉटेलकडे यासंदर्भात तक्रार केली.

परंतु डॉक्टरांच्या आजारी पडण्याचा आणि जेवणाचा काही संबंध नसल्याचे हॉटेल प्रशासनाने सांगितले. यानंतर सोल्यूशन ग्रुप इंडियाने यांसंदर्भात तक्रार करून कायदेशीर नोटीस हॉटेल प्रशासनाला पाठविली आहे. या नोटीसची एक प्रत पालिका आरोग्य विभागाकडे पाठविली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विवाहितेला ब्लॅकमेल करणारा गजाआड

News Desk

बारा तास वीज पुरवठा, शेतक-यांची पुन्हा चेष्ठा

News Desk

म्हाडाच्या घरांसाठी लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध

News Desk