HW News Marathi
मुंबई

पत्रीपूल पाडण्यास सुरुवात, कल्याण-डोंबिवली दरम्यान जबोब्लॉक

कल्याण | अंधेरी येथील पूल दुर्घटनेनंतर या पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले होते. यात हा कल्याण येथील जूना पत्रीपूल धोकादायक असल्याचे समोर आल्याने सप्टेंबरपासूनच या पुलावरुन वाहतूक बंद करण्यात आली होती. बाजूकडील केडीएमसीच्या उड्डाणपूलावरुन सद्यस्थितीला वाहतूक सुरू आहे. बाजूकडील केडीएमसीच्या उड्डाणपूलावरुन सद्यस्थितीला वाहतूक सुरू आहे.

या पत्रीपूल पाडण्याचे कामाला आज (१८ नोव्हेंबर)ला सुरुवात झाली आहे. या कामासाठी कल्याण-डोंबिवली दरम्यान सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० असा सहा तासांचा जम्बोब्लॉक रेल्वेकडून घेण्यात आला आहे. या रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या जबोब्लॉकचा परिणाम वाहतुकीवर होऊ नये म्हणून शहर पोलीस, केडीएमटी आणि राज्य परिवहन यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

सीएसटीहून कर्जतसाठी सकाळी ८.१६ वाजता लोकल रवाना करण्यात आली असून कल्याणहून सकाळी ९.०९ वाजता लोकल रवाना झाली आहे. सकाळी ९.३० वाजेच्या नंतर कल्याण डोंबिवलीदरम्यान एकही लोकल धावणार नाहीय. जूना पत्रीपूल शिस आणि लोखंड मिश्रित असून तो १२९ टन आहे.

७० अधिकारी, ४५० कर्मचारी यांच्या वतीने ही मोहीम पार पडणार आहे. पुलावर ६० टनाचे दोन स्पॅन असून ६०० टन क्षमतेची क्राऊल क्रेन पूर्वेकडील बाजूस तर पश्चिमेकडील बाजूस ४०० टन क्षमतेची क्राऊल क्रेन आहे. या क्रेनच्या व्यतिरिक्त २५० टनाची क्रेन आणि रेल्वेची १४० टनाची क्रेन आणण्यात आली आहे. पत्रीपुलाच्या खालून जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या २५ हजार व्होल्टच्या वाहिन्या उतरवण्याचे कामाला सुरुवात झाली असून मुख्य पाडकामाला लवकरच प्रारंभ होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आईला लाथ मारल्याचा रागातून भाऊजीची हत्या

News Desk

भाजप पक्षाला जनतेने देशद्रोही घोषित केले !

swarit

खोटे वृत्त प्रकाशीत करून बदनामी केल्याप्रकरणी सचिन सावंत यांचे तरुण भारत वृत्तपत्राला कायदेशीर नोटीस

News Desk