HW News Marathi
मुंबई

उर्मिला अभिनय नव्हे तर सॉफ्टपॉर्नसाठी ओळखली जाते ! कंगनाच्या टिकेनंतर बॉलिवूड संतप्त

मुंबई । “उर्मिला मातोंडकर अभिनयासाठी ओळखली जात नाही. ती सॉफ्ट पॉर्नस्टार म्हणून ओळखली जाते”, अशी अत्यंत हीन दर्जाची टीका अभिनेत्री कंगना राणावत हिने केली आहे. कंगनाच्या मुंबई, मुंबई पोलीस आणि बॉलीवूडवरच्या टिकेनंतर उर्मिला यांनी कठोर शब्दांत सूनवल्यानंतर कंगनाने ही वादग्रस्त टीका केली. मात्र, त्यानंतर आता बॉलीवूडमधून उर्मिला यांची भक्कमपणे पाठराखण केली जात आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1306443471746560000?s=19

उर्मिला यांच्यावर टीका करताना कंगनाने मर्यादा सोडल्याचे दिसत आहे. “उर्मिला मातोंडकर… ती सॉफ्ट पॉर्नस्टार आहे. मला माहित आहे की हे अत्यंत निंदनीय आहे. पण ती निश्चितच तिच्या अभिनयासाठी ओळखली जात नाही. उर्मिला मातोंडकर कशासाठी ओळखली जाते? सॉफ्ट पॉर्नसाठी… बरोबर ना? मग जर तिला तिकीट मिळू शकतं, तर मला का नाही ?”, असे कंगना टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती.कंगनाच्या या जहरी टिकेनंतर बॉलीवूडमधून उर्मिला मातोंडकर यांची पाठराखण होत आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1306225419767525376?s=19

 

उर्मिला मातोंडकर काय म्हणाल्या?

“संपूर्ण देश ड्रग्जच्या विळख्यात आहे. मात्र, हिमाचल प्रदेश हे ड्रग्जचे उगमस्थान असल्याची कंगनाला कल्पना आहे का? ‘क्या उखाड दोगे, किसके बाप का राज है’ अशी भाषा कोणती सुसंस्कृत मुलगी वापरते? तिच्या ऑफिसवर झालेली कारवाई निंदनीयच आहे, त्याला माझा पाठिंबा नाही. भाजपकडून निवडणुकीची उमेदवारी मिळवण्यासाठी ती त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे.”

ड्रग्जचे सेवन करणाऱ्या बॉलिवूडमधील कलाकारांची नावे जाहीर करण्याच्या कंगनाच्या दाव्यावर उर्मिला म्हणाल्या की, “नावे कुठे आहेत? माझी इच्छा आहे की कंगनाने प्रत्यक्षात पुढे यावे आणि त्या सर्वांची नावे घेऊन इंडस्ट्रीला मदत करावी. चला सफाई करुया. यामध्ये मी तुला पाठिंबा देणारी पहिली व्यक्ती असेन मुली.”

.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाणार प्रकल्प होऊ देणार नाही: राणे

swarit

मुंबईकरांसाठी खुशखबर जुलै महिन्यात म्हाडाची जाहिरात प्रसिद्ध होणार

News Desk

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या निलंबनाचे निर्देश

News Desk