HW News Marathi
मुंबई

करणी सेनेचे सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालया बाहेर आंदोलन

मुंबई – राजपूत इतिहासावर आधारित असलेला बहुचर्चित ‘पद्मावती’ हा सिनेमा रिलीज होण्यापुर्वीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आज या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाचे यू ए प्रमाणपत्र देण्यात आले. या सिनेमाचा विरोध करण्यासाठी करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालया बाहेर आंदोलन केले. यावेळी परिस्थती हाता बाहेर जावू नये म्हणून पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

लोकांचा विरोध होत असल्याचे लक्ष्यात येताच भन्साळी यांनी सिनेमा रिलीजची तारीख पुढे ढकलली. ‘पद्मावती’ हे नाव बदलून ‘पद्मावत’ करण्यात असून या सिनेमावर १५० कोटी रुपये खर्च केले आहे. हा सिनेमा २५ जानेवारी रोजी रिलीज होणार आहे.

हा सिनेमा १ डिसेंबरला रिलीज होणार होता. पण, भन्साळी यांनी सिनेमात योग्य पद्धतीने इतिहास न मांडलाचा आरोप करणी सेना करत आहे. त्यामुळे ही सेना सतत या सिनेमा आंदोलन करुन विरोध दर्शवित आहे. या राजपूत संस्कृती मलीन करण्यासाठी हा सिनेमा बनवण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…आता पुढील स्थानक प्रभादेवी

News Desk

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी स्ट्रक्चरल ऑडिटरच्या पोलीस कोठडीत १० एप्रिलपर्यंत वाढ

News Desk

२९ तारीख मुंबईकरांसाठी घातक

News Desk